NarayanRane-AjitPawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'महाविकास आघाडी सरकार पडेल, राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आलाय'

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं; पण..

सातारा : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची नुकतीच मतमोजणी पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व दिसून आलंय. एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर भाजपचा विजय, तर आठ जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विजयानंतर (Sindhudurg District Bank Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि निवडून आलेल्या सर्व संचालकांचं अभिनंदन केलंय. मात्र, अभिनंदन करत असताना अजितदादांनी राणेंच्या 'आता महाराष्ट्रावर लक्ष' या घोषणेचा चांगलाच समाचार घेतलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सातारा (Satara) जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाबाबत पवार म्हणाले, निवडणुकीत यश-अपयश येतचं असतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. मात्र सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगलं यश मिळालंय, असं त्यांनी नमूद केलं.

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचं पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडं लक्ष लागलं होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर आरोप झाले होते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीवर मात करत भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलंय. सिंधुदुर्गवर भाष्य करताना पवार पुढे म्हणाले, राणेंनी पुढं काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाच वर्षे टिकेल, असा विश्वास सुद्धा अजितदादांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा सातत्यानं केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रुपानं आणखी एक माणूस आला आहे. खरं तर नारायण राणेंनी मागे असेच सन 1999 ते 2004 कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही, याचा दाखला देत उपमुख्यमंत्र्यांनी राणेंचा चिमटा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT