ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मेळावा! PM मोदींचं कौतुक तर शरद पवारांवर वयाचा उल्लेख करत साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी पंतप्रधानांवर कौतुकाचा वर्षाव केला तर शरद पवारांवर वयावरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर वयावरून पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. वय 80 झालं तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. वय झालं की थांबायचं असतं पण काही जण अती करतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून हा पक्ष अनेकदा सत्तेत स्थापन झाला. हसन मुश्रीफ, बाबा अत्राम, आदिती तटकरे, प्रफुल पटेल आम्ही सर्वांनी ठरवलं सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेमध्ये सामील गेलं पाहिजे. आज देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व नाही, जगामध्ये भारताची शान आणि मान वाढवण्याचे काम भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून झालेलं आहे. गेल्या ९ ते १० वर्षांच अनेक विकासकामे झाली. भारत आज आगेकूच करतोय. आज ८० कोटी जनतेला केंद्र सरकार मोफत अन्नधान्य देत आहे, असं म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले, एका वयानंतर थांबायचं असतं. वय झाल्यानंतर थांबायला हवं. पण काही जण ऐकत नाही. हट्टीपणा करतात. राज्य सरकारमध्ये ५८ वर्षांत निवृत्त होतात. काही जण ६२ तर काही जण ६५ मध्ये निवृत्त होतात. काही जण ७५ वर्ष निवृत्ती स्वीकारतात. परंतु काही जण मात्र ८० वर्षी थांबत नाही. ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाही, काय चाललंय काय, आम्ही आहे ना, आम्ही कुठं चुकलो तर सांगा आम्हाला, आमच्यामध्ये तेवढी ताकद आणि धमक आहे. ४ ते ५ वेळा आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवार यांचं नाव न घेता टोला लगावला आहे.

अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी 18-18 तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे.

जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था 5 नंबरवर पोहोचली आहे. 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही, याची काळजी पीएम मोदी घेत आहेत. शेतकऱ्याला वर्षाला 6 केंद्र सरकारकडून मिळतात. राज्य सरकारकडूनही 6 हजाराची भर टाकली. आता शेतकऱ्याला वर्षाला 12 हजार रुपये मिळतात.

ठाणे जिल्ह्यात कधीकधी गुंडगिरी डोकं वर काढते – अजित पवार

ठाणे जिल्ह्यात कोण दादागिरी करतो. कोण दहशत निर्माण करतो. त्यांच्यावर पोलिसांनी डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार करा, यावेळी तिसऱ्यांदा मोदींना निवडून देण्यासाठी आपण जमलोय असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: हवामान विभागाचा २१ ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT