औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर निशाणा साधताना त्यांना गंभीर इशाराही दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडे सर्वांच्या घोटाळ्यांचा डेटा आला असून याच्या चौकशा झाल्यातर यांची पळताभुई थोडी होईल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. (All Scam data has been collected by CM Eknath Shinde Abdul Sattar warned)
सत्तार म्हणाले, "काही लोक हे उद्योगपतींसाठी काम करतात. काही जणांच्या सुपर्मा, सुसुपर्मा, सुटूपर्मा सर्व काढल्या बाहेर, त्यांच्या जुन्या प्रकरणांच्या चौकशा बाहेर काढल्या तर? हे बळजबरी म्हणतात क्लीनचीट मिळालीए पण कोणतीही क्लीनचीट मिळालेली नाहीए. मी तर छोटा कार्यकर्ता आहे. पण यांनी जे गिळलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राराला यांच्या चौकशा झाल्या तर यांची पळताभुई थोडी होईल."
आमच्या मुख्यमत्र्यांकडे सर्वांचा डाटा जमा झालेला आहे. सर्वांनी काय काय केलेलं आहे, कधी कधी केलेलं आहे? कोणत्या कोणत्या वर्षात केलेलं आहे? याची डिटेल माहिती आहे. सभागृहात यावर मुख्यमंत्रीही बोलले आहेत, अशा शब्दांत सत्तारांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्र्यांना मी टीईटीबद्दल सांगितलं की, यामध्ये मी पंचवीस पैशाचा घोटाळा केला असेल तर आम्हाला फासावर लटकवा. यासाठीच्या कागदाची किंमत पगार नाहीतर नोकरीसाठी असते. आम्ही यामध्ये कसलाच घोटाळा केला नाही असा रिपोर्ट आयुक्तांनी दिला, जिल्हा शिक्षणाधिकारी, उपसंचालक, संचालक यांनीही दिला. यापेक्षा आता काय प्रुफ पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील.
हे ही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.