Mumbai Municipal Corporation Election Amit Thackeray
Mumbai Municipal Corporation Election Amit Thackeray esakal
महाराष्ट्र

Amit Thackeray : शिवसेना-मनसे एकत्र येणार? युतीबाबत 'राज'पुत्र अमित ठाकरेंचं मोठं विधान

हेमंत पवार

मनसेला फक्त पंधरा वर्षांचं आयुष्य आहे. राजकारणात संयम महत्त्वाचा आहे.

कऱ्हाड : महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल करतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, पाणी, रस्त्यांचे प्रश्न आहेत. मात्र, त्याचा विषय कोणी काढला की महापुरुषांविषयी कोणीतरी काहीही बोलतो आणि मूळ विषयाला बाजूला सारलं जातं. महापुरुषांबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? असा जहरी सवाल राज्यकर्त्यांना उद्देशून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज कऱ्हाड (जि. सातारा) येथे उपस्थित केला.

शिवसेना (Shiv Sena)-मनसे एकत्र येणार नाही. मुंबई महापालिकेत आमची कोणासोबत युती होईल का नाही हे माहित नाही. मात्र, मनसेनं स्वबळावर निवडणुकीसाठी (Mumbai Municipality) तयारी केली आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे (Amit Thackeray) आज कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी विद्यानगर परिसरातील मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, राजेंद्र केंजळे, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, नितीन महाडिक आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला नेता मी पाहिलेला नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एसटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु. मनसे (MNS) वाढीसह विद्यार्थी संघटना बांधणीस महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले.

शिवसेना व मनसे एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, त्यामध्ये सत्य नाही आणि ते शक्यही नाही, असं सांगून अमित ठाकरे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत तयारी असेल तर मनसे या निवडणुका स्वतंत्रपणे लढवेल. मात्र, काय होतं हरलो तर राजसाहेब हरले आणि जिंकलो तर पक्ष जिंकला, असं म्हंटलं जातं.

मनसेला फक्त पंधरा वर्षांचं आयुष्य आहे. राजकारणात संयम महत्त्वाचा आहे. राजकारणात येणाऱ्या युवकांनी संयम ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे. राजसाहेबांनी सांगितलं तर राजकारणात नक्की येईन. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या जातात. त्या सुट्ट्या का दिल्या जातात त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही चांगलं काम करत आहेत. परंतु, राजसाहेब ठाकरे यांच्याकडं सत्ता दिल्यानंतर अधिक चांगलं काम होईल याचा मला विश्वास आहे.

Amit Thackeray

मीडियानं तारतम्य ठेवावं

शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी, नोकरी, बेरोजगारी, पाणी प्रश्नासंदर्भात कोणी बोलायला तयार नाही. त्याऐवजी महापुरुषांची बदनामी करायची आणि विषय बदलायचा, असं सध्या राज्यात सुरु आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. महापुरषांबद्दल अपमान केला जातो हे मीडियावाल्यांनी दाखवणंच बंद केलं पाहिजे, असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं.

ठाकरेंना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

विद्यानगर इथं मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते आज झालं. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती लावून ठाकरे यांना मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांना दिवसभर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळं त्यांच्या दौऱ्याची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT