amol Kolhe on Sambhaji Maharaj Memorial Fund eknath shinde govt Maharashtra news  e sakal
महाराष्ट्र बातम्या

संभाजी महाराज स्मारक निधीला स्थगिती; कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रात असं काही...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या नव्या सरकारकडून दररोज नवीन घोषणा केल्या जात आहेत, यातच मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात असं काही घडू शकतं यावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं आहे.

"महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी आपण निधी मंजूर करून आणला होता. परंतु त्याला आता स्थगिती देण्यात आल्याची बातमी कानावर आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात असे काही घडू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये. कारण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर, आत्मियता आणि अभिमान नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही." असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

"याला कोणताही पक्ष, कोणतीही विचारसरणी, कार्यकर्ता किंवा नेता अपवाद असूच शकत नाही. त्यामुळे सदर स्थगिती स्मारकाच्या विकास कामात काही विधायक बदल करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी आणलेली असू शकते, असे एक शंभूभक्त म्हणून मला वाटतेय." असे कोल्हे म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी "तसेच असेल असा विश्वास मनात ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की, आपण स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा." असे देखील अमोल कोल्हे म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारने नुकतेच पुणे जिल्ह्यातील ९४१ कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना स्थगिती दिली आहे. यापैकी तब्बल २४५ कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. मार्च २०२२ ते जून २०२२ या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघात मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT