Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदेंच्या कार्यक्रमात महापुरुषांचा अनादर; मिटकरींनी शेअर केला व्हिडीओ

व्यासपीठावर ठेवलेल्या छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा खाली पडलेल्या दिसत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हि़डीओसोबतच तिथे घडलेल्या प्रकाराबद्दल संतापही व्यक्त केला आहे. तसंच महापुरुषांचा अनादर झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मिटकरींनी ट्वीटही केलं आहे. (Amol Mitkari Shared a video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) एका सत्कार समारंभातला हा व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओमध्ये व्यासपीठावर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसत आहे. एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या प्रतिमाही ठेवलेल्या दिसत आहेत. मात्र व्यासपीठावरच्या गर्दीचा या प्रतिमांना धक्का लागला आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) आणि बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) प्रतिमा खाली पडलेल्या दिसत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना अमोल मिटकरींनी (NCP MLA Amol Mitkari) ट्वीटही केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "राजकारण करा पण महापुरुषांचा असा अनादर होत असेल तर ते जनता सहन करु शकणार नाही. निषेध!" हा व्हिडीओ कोणत्या कार्यक्रमातला आहे, हे मात्र या व्हिडीओतून स्पष्ट कळत नाहीये. मात्र एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराचा हा कार्यक्रम असल्याचं इथल्या पोस्टरवरुन दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT