Loksabha Election Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंनी बाहेर काढला 'हुकमी एक्का'; थेट उमेदवारी देत अजितदादा गटाचं वाढवलं टेन्शन

ठाकरे यांनी लोकसभेच्या तयारीला जोमाने सुरुवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोकणातील दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्या आहेत.

खेड : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अनंत गीते यांना जाहीर झाली आहे. गत लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी अनंत गीते यांना पराभूत करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. परंतु, त्यावेळी विजयासाठी त्यांची दमछाक झाली होती.

रायगड मतदारसंघातील सर्वच तालुक्यांत उलटसुलट राजकीय समीकरणे जुळवून तटकरेंनी विजयश्री खेचून आणली होती. हे आव्हान तटकरे कसे पेलतात हे आगामी निवडणुकीत दिसेल; मात्र गीतेंच्या उमेदवारीने लढत नक्कीच लक्षणीय ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपले नाव जाहीर केले असल्याची माहिती अनंत गीते (Anant Geete) यांना माध्यमांना दिली. सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अनंत गीते यांना उमेदवार बनवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तयारीला लागा हा आदेश मिळाल्याने रायगड मतदारसंघात लक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे.

इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कोकणातील दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी लोकसभेच्या तयारीला जोमाने सुरुवात केली आहे. अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समर्थक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना गत लोकसभा निवडणुकीत ३१,४३८ मतांनी पराभूत केले होते. या लोकसभा मतदार संघात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड - मंडणगड विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. गत निवडणुकीत प्रत्येक तालुक्यात सुनील तटकरे यांना त्यांच्या फायद्याची राजकीय समीकरणे जुळवावी लागली होती.

अंतर्गत दुफळी नडली

शिवसेनेतील अंतर्गत दुफळी गीते यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते. परंतु यावेळी या मतदारसंघातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट असून अनंत गीते यांचे हात बळकट करण्यासाठी इंडिया आघाडी सावध व्यूहरचना करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT