Shinde-Fadnavis Government vs Anna Hazare
Shinde-Fadnavis Government vs Anna Hazare esakal
महाराष्ट्र

Anna Hazare : वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे संतापले; सरकारला दिला थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

Anna Hazare News : सत्तेत असताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं (Mahavikas Aghadi Government) सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली होती. यावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावेळी भाजपनं महाविकास आघाडी सरकाला चांगलंच धारेवर धरलं होतं. यानंतर नव्यानं सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबतचं धोरण राबवणार आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मॉलमध्ये वाईन विक्री (Wine Sales in Mall) करण्याच्या धोरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. देसाईंच्या प्रतिक्रियेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hazare) नव्या सरकारलाच थेट इशारा दिलाय. माॅल संस्कृती ही आपली नाही. ती विदेशी संस्कृती आहे. आताचं सरकार मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण, तसं झालं तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल, असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यावर अण्णा हजारेंनी ही प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. मॉलमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयासंदर्भात लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. या सर्व मतांचा विचार करुन ड्राफ्ट तयार केला जाणार आहे. जनतेच्या मताचा विचार करुन मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. हा वाईन विक्रीच्या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही देसाईंनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT