वाचन अभियान Sakal
महाराष्ट्र बातम्या

पहिली ते चौथीचे शिक्षकांना घ्यावे लागणार ज्यादा तास! लेखन, वाचन, आकडेमोडीचा होणार सराव

कोरोनामुळे सलग दोन वर्षे (२३ महिने) शाळा विशेषत: पहिली ते चौथीचे वर्ग पूर्णत: बंद राहिले. त्या मुलांना ऑनलाइन शिक्षणदेखील समजले नाही आणि घरीही त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास केला नाही.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे सलग दोन वर्षे (२३ महिने) शाळा विशेषत: पहिली ते चौथीचे वर्ग पूर्णत: बंद राहिले. त्या मुलांना ऑनलाइन शिक्षणदेखील समजले नाही आणि घरीही त्यांनी नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यास केला नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून लेखन, वाचन व अंकगणिताचा सराव घेऊन त्या मुलांची बौद्धिक क्षमता विकसीत केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी ज्यादा तास घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर, हातावरील पोट असलेल्यांच्या उदरनिर्वाहावर, व्यावसायिकांच्या व्यवसायावर आणि मुलांच्या गुणवत्तेवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. आता कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. अडचणीतील व्यवसाय पुन्हा सुस्थितीत आले आहेत. पण, मुलांची गुणवत्ता सुधारलेली नाहीच. भविष्याची चिंता असलेल्या पालकांनी मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळांना लक्ष देण्याची विनंती केली आहे. काही शाळा पालकांकडून मुलांच्या प्रगतीबद्दल लेखी अर्ज घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांमधील शिक्षकांनी चिमुकल्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ठोस नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे कळविले आहे. मुलांना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार सध्या एकाही विद्यार्थ्यास मागील वर्गात ठेवले जात नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची बौद्धिक पातळीदेखील वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शिक्षकांना त्या मुलांसाठी ज्यादा तास घ्यावे लागणार आहेत.

ज्यादा तास घ्यावे लागतील
१५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. महापालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील मुलांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने पहिली ते चौथीतील मुलांची क्षमता पडताळणी करून त्यांच्यासाठी शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागतील.
- संजय जावीर, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर

प्राथमिक शाळांची स्थिती
महापालिकेच्या शाळा
५८
विद्यार्थी संख्या
५,९००
झेडपीच्या शाळा
२,७७९
एकूण विद्यार्थी
२.१६ लाख
पहिली ते चौथीतील विद्यार्थी
१.०३ लाख

पहिल्या दिवशी मुलांना गणवेश नव्हे पुस्तकेच
जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसह अनुदानित शाळांमधील मुलांना १५ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. शाळांनी तशी संपूर्ण तयारी केली आहे. त्याच दिवशी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामंधील एक लाख ४८ हजार ४०५ (पहिली ते आठवी) विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गणवेशाचे पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना उशिराने मिळाल्याने शिवणकामालाही विलंब झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात गणवेश मिळतील, अशी स्थिती बहुतेक शाळांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT