Prabhakar Sail Death Case सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

"साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?"

पंच प्रभाकर साईल मृत्यु प्रकरणी राष्ट्रवादीने चौकशीची मागणी केली.

सकाळ डिजिटल टीम

कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्युची बातमी पसरताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. राष्ट्रवादीने या प्रकरणी चौकशीची मागणी केली. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले, “मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?”

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधासभेत प्रश्न उपस्थित करताच काही वेळाने याप्रकरणातील तक्रारदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. हिरेन यांचा मृतहेद मुंब्रा खाडीत पोलिसांना सापडला होता. यावरुन भातखळकरांनी पंच प्रभाकर साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना, असा टोला लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT