education Medical admission  esakal
महाराष्ट्र बातम्या

AYUSH Courses Admission : ऑल इंडिया कोटा प्रवेशाची उद्यापासून प्रवेशप्रक्रिया; जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

AYUSH Courses Admission : आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी या शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावरील कोट्याच्‍या राखीव जागांवर प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली आहे.

खासगी विनाअनुदानित आणि अल्‍पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राखीव १५ टक्‍के ऑल इंडिया कोटाच्‍या जागांवर इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शुक्रवार (ता. १)पासून नोंदणी करता येणार आहे.

सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमांना नीट परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिले जात असतात. (AYUSH Courses All India Quota Admission Admission Process From Tomorrow nashik news)

सध्या राज्‍यस्‍तरावरील ८५ टक्‍के प्रवेश क्षमतेवरील जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू आहे; तर १५ टक्‍के जागा या राष्ट्रीय स्‍तरावरील कोट्यासाठी राखीव असतात. या जागांवर प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे.

आयुषअंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस) आणि युनानी (बीयूएमएस) या अभ्यासक्रमांमध्ये खासगी किंवा अल्‍पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयात राखीव १५ टक्‍के ऑल इंडिया कोट्यासाठी विद्यार्थ्यांना या माध्यमातून संधी उपलब्‍ध होणार आहे. यापूर्वी राज्‍यस्‍तरावरील प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय कोट्यात प्रवेश घ्यायचा असेल, त्‍यांना पुन्‍हा नोंदणी करावी लागेल.

त्‍यासाठी दोन हजार रुपये शुल्‍क व ५० हजार रुपयांची अनामत रक्‍कम जमा करावी लागेल. यासंदर्भातील सविस्‍तर सूचना जारी केलेल्‍या आहेत. विद्यार्थी व पालकांनी नोंदणी करण्यापूर्वी या सूचनांचे काटेकोरपणे वाचन करावे, असे स्‍पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्‍यान, दोन प्रवेश फेऱ्या राबविल्‍यावर रिक्‍त राहिलेल्‍या जागा या राज्‍यस्‍तरीय कोटाच्‍या प्रवेशासाठी उपलब्‍ध करून दिल्‍या जाणार असल्‍याचे सूचनापत्रात नमूद केले आहे.

ऑल इंडिया कोट्यासाठी प्रवेश वेळापत्रक असे

ऑनलाइन नोंदणी करणे----------------१ ते ५ सप्‍टेंबर

ऑनलाइन शुल्‍क भरणे------------------६ सप्‍टेंबरपर्यंत

आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करणे----६ सप्‍टेंबर

प्रारूप गुणवत्ता यादीची प्रसिद्धी--------८ सप्‍टेंबर

ऑनलाइन प्रेफरन्‍स फॉर्म भरणे---------९ ते १२ सप्‍टेंबर

पहिल्‍या फेरीची निवड यादी--------------१३ सप्‍टेंबर

यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत------१४ ते १८ सप्‍टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल ते मोठा नेता भ्रष्टाचारात अडकणार? काय सांगतं राजकीय भविष्य?

US Immigration Rule: अमेरिकेचा अजून एक मोठा धक्का! परदेशी लोकांसाठी प्रवेश आणि निर्गमन नियम बदलले, आता प्रवेशासाठी 'ही' गोष्ट आवश्यक

"मी पुन्हा सीन करणार नाही" जेव्हा शुटिंगवेळी शाहरुखवर भडकले सतीश शाह ; 'हे' होतं कारण !

Ajit Pawar : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज

Governor Acharya Devvrat : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी दैवी, त्यांच्यात अशक्यही शक्य करण्याची ताकद'', महाराष्ट्राचे राज्यपालांचे प्रशंसोद्‌गार....

SCROLL FOR NEXT