aditya thakrey
aditya thakrey sakal
महाराष्ट्र

गरोदर वनक्षेत्रपालाला मारहाण; आदित्य ठाकरे म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

माजी पुरुष सरपंचाकडून तीन महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Beat the forest ranger) केल्याची गंभीर घटना महाराष्ट्रातील साताऱ्यातील पळसवडे इथे घडली होती. या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आज सकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. कायद्याला कठोरपणे सामोरे जावे लागेल. अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakare) यांनी दिली.

सातारा (Satara) येथील पळसवडे गावात वनमजुराच्या बदलीच्या वादातून गर्भवती वनपरिक्षेत्रपालाला मारहाण केल्याप्रकरणी पुरुषाला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी हा माजी गावप्रमुख असून स्थानिक वन समितीचा सदस्य आहे. खारगाव जंगलातील वनरक्षक सिंधू सानप हिने आरोप केला आहे की, जेव्हापासून ती ड्युटीवर रुजू झाली तेव्हापासून आरोपी तिला धमकावत आणि पैशाची मागणी करीत होता. बुधवारी (ता. १९) त्यांनी मला मारहाण केली. कामावरून परतत असताना पतीला चप्पलने मारहाण (Beat the forest ranger) केली. सानप या तीन महिन्यांची गर्भवती आहे.

माजी गावप्रमुख रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर या आरोपींविरुद्ध सातारा (Satara) तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागवून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सानप यांच्या गर्भाला काही इजा झाली आहे की नाही याचा आम्ही तपास करीत आहोत. ते आढळल्यास संबंधित गुन्हा दाखल केला जाईल. प्रथमदर्शनी कोणतीही हानी झालेली नाही, असे सातारा एसपी अजय कुमार बन्सल म्हणाले. या घटनेचा निषेध करीत महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakare) यांनी ट्विट केले आहे की, ‘आज सकाळी आरोपीला अटक करण्यात आली असून, कायद्याला कठोरपणे सामोरे जावे लागेल. अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT