Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का! पवार, जयंत पाटलांच्या दौऱ्याआधी शिलेदारांनी सोडली साथ

राष्ट्रवादीला मोठं खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने दौरे, चर्चा, भेटी सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राज्यात दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाला गळती लागली असून राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे शहर आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत.(Latest Marathi News)

दरम्यान राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला किंवा मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीमधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी आज (ता.३१ मे) रोजी शासकीय विश्रामगृह येथे शहराध्यक्ष, पक्ष निरीक्षक यांवर विविध आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला.

विरोधीपक्ष नेते अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उद्या (ता. १ जून) दौऱ्यावर येणार आहेत. १ जूनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतिबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना बोलताना दिली.(Latest Marathi News)

दिलीप कोल्हे यांनी पक्ष निरीक्षक, शहराध्यक्ष यांवर विविध आरोप करत पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला होता. प्रवेशावेळी शिंदे गट शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे दिलीप कोल्हे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, संजय सरवदे, ब्रम्हदेव गायकवाड, महिला जिल्हाप्रमुख रविना राठोड, शहरप्रमुख जयश्री पवार, सुनंदा साळुंके, मनीषा नलावडे, माधुरी पवार, पुजा चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, सागर शितोळे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख सुजित खुर्द, बाळासाहेब निकम, सुधीर गोरे, राजकुमार शिंदे, प्रकाश शिंदे, जावेद पटेल, उपशहर प्रमुख विशाल कल्याणी, शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते. (Latest Marathi News)

सहा महिन्यांपासून गळती

शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहरात मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आज अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

FDA Milk Raid Rumour : तुकाराम मुंडेंची एवढी भीती? FDA धाडीच्या एका अफवेने दूध चालकांनी शेकडो लिटर दूध ओतलं रस्‍त्‍यावर; 'त्या' व्हिडिओनं वाढवलं दुधातील भेसळीचं गूढ

SCROLL FOR NEXT