Gunaratna Sadavarte And BJP Leader Swapnil Galdhar esakal
महाराष्ट्र बातम्या

सदावर्ते यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला भाजप देणार ५० हजारांचे बक्षीस

गुणरत्न सदावर्ते यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला भाजप देणार बक्षीस

दत्ता देशमुख

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईच्या घरावरील हल्ला प्रकरणात पोलिस कोठडीत असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे भाजप व आरएसएस असल्याचा आरोप होत आहे. सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भारतीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याची मागणीही भाजपचे बीड तालुकाध्यक्ष अॅड. स्वप्नील गलधर यांनी केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे मागील साडेपाच महिन्यांपासून आंदोलन आणि संप सुरु आहे. या संपाला हिंसक वळणही लागले आहे. (BJP Announced 50 Thousand Award For Who Blacken Face Of Gunaratna Sadavarte)

दरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असून त्यांची न्यायालयात बाजूही लढत आहेत. यापूर्वीही अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांनी चर्चेत असतात. मराठा समाजाच्या आरक्षणालाही त्यांनी न्यायालयात विरोध केला. दरम्यान सदावर्ते यांना भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप राष्ट्रवादी नेते आणि राष्ट्रवादीचे समर्थक नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) करत आहेत. त्यातच आता बीडचे (Beed) भाजप तालुकाध्यक्ष गलधर यांनीच अॅड. सदावर्तेंच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केल्याने हा मुद्दा चर्चेत आला आहे.

गुणरत्न सदावर्ते समाजा-समाजामध्ये आणि जातीय तेढ निर्माण करणारा व्यक्ती आहे. तसेच त्यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, म्हणून गुणरत्न सदावर्तेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी केली आहे. सदावर्ते राजे - महाराजे, मराठा समाज तसेच धार्मिक विषयांवर कायम अनादर करणारे शब्द वापरतात. समाजात वाद पेटविणे, दंगली घडविणे तसेच राजकीय नेत्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने वर्तन करत असल्याने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंद करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT