political
political esakal
महाराष्ट्र

अक्कल खंडणीसाठी अन् FB लाईव्हला लागते; भाजप आमदाराचा पलटवार

सकाळ डिजिटल टीम

'प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही असे मुख्यमंत्री म्हणालेत. खरं आहे.'

मुंबई महापालिका कौतुकासाठी नाही तर कर्तव्य म्हणून काम करते. स्वत: काहीही न करता, महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात. यावरून प्रश्न विचारणं सोपं असतं त्याला अक्कल लागत नाही असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता विरोधकांकडून पलटवार होत आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर दिले आहे.

याप्रकरणी आमदार भातखळकर यांनी ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही असे मुख्यमंत्री म्हणालेत. खरं आहे. अक्कल ही फक्त महिना १०० कोटी खंडणी गोळा करायला, फेसबुक लाइव्ह करायला आणि घरी बसून फुकाच्या वाफा दवडायला लागते, असा पलटवार करत त्यांनी चिमटा काढला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मुंबई महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आलं होतं. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. कोरोनाकाळात महापालिकेने केलेल्या कामांची दखल थेट न्यूयॉर्क आणि सर्वोच्च न्यायालयानं घेतली असुन त्यांनी कौतुक केलं असल्याचंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. मुंबई महापालिका देशातील एक नंबरची आहे. मात्र जरा कुठं काय खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक, महापौर, आयुक्त काय करतात? यावर सवाल उपस्थित होतात. हे सगळं ठीक आहे. पण यावर तुम्ही काय करता हे सांग? स्वत: काहीही न करता फक्त प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज लागत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT