bjp not being serious about coronavirus and lockdown says shiv sena in samana 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष; सामनाच्या अग्रलेखातून टीका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी ठोस पावलं उचलली जात आहे. परंतु, भाजपकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत न करणाऱ्यावर शिवसेनेनं भाजपवर मुखपत्र असलेल्या सामनातून सडकून टीका केली आहे. भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधत पोलिसांच्या दंडुकीशाहीचे समर्थन केले आहे. पोलिसांच्या दंडुकीशाहीवर फडणवीस टीका करताना ठाकरे सरकारला लक्ष्य केले होते. त्यावरून राऊत यांनी फडणविसांवर सडकून टीका केली आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील शाहीनबागमध्ये भीषण आग

पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्‍यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोनशेच्या घरात गेला आहे. हे लक्षण चांगले नाही. राज्यात दोनशे व संपूर्ण देशात हजारांवर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे, पण लोकांना या महामारीचे गांभीर्य खरंच समजले आहे काय ? कोरोनाची समस्या अशी आहे की दाबण्यासाठी हिंदू-मुसलमान असा खेळ करूनही उपयोग नाही. मंदिर, मशीद, शाहीन बाग वगैरे पत्ते पिसूनही कोरोनावरील मात शक्‍य नाही. येथे सरकारला कष्ट करावे लागतील व जनतेला स्वयंशिस्त पाळावी लागेल.

Coronavirus : एका दिवसात महाराष्ट्रातील आकडा १२ने वाढला; कोणत्या ठिकाणी किती वाढले रुग्ण 

सरकारने दिवसांचे "लॉक डाऊन जाहीर करूनही लोक रस्त्यावर उतरतात, गर्दी करतात. पुन्हा पोलिसांनी दंडुके उगारले तर हे कायद्याचे राज्य आहे काय असा प्रश्न विचारतात. होय, हे कायद्याचेच राज्य आहे. म्हणूनच पोलीस फक्त दंडुक्‍याचा वापर करीत आहेत. चीनसारखे राष्ट्र असते तर काय झाले असते सांगता येत नाही. रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस दंडुके मारतात म्हणून सरकारवर टीका केली जात आहे. मग महाराष्ट्र वाचविण्यासाठी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन टीकाकारांनी करावे. इराणमध्ये रस्तोरस्ती, इटलीच्या चौकाचौकांत कोरोना रुग्णांचे मुडदे पडत आहेत. तसे मुडदे येथील रस्त्यांवरही पडू द्यायचे काय ? डॉक्‍टरांवर ताण आहे तसा पोलिसांवरही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT