kishori pednekar
kishori pednekar Team eSakal
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत, या प्रश्नावर महापौरांचं 'नो कमेंट्स'

सकाळ डिजिटल टीम

आजकाल वातावरणातही बदल होतो आहे. त्यामुळे काळजी घ्या असे आवाहन पेडणेकरांनी केले.

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री (CM uddhav thackeray) सर्जरीमुळं मागील काही दिवसांपासून विश्रांती घेत आहे. तब्येत बरी नसल्यानं ते कामकाजावरही रुजू झालेले नाहीत. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकाही होत आहे. दरम्यान, आज मुंबई (BMC) महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori pednekar) मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत का ? या विचारलेल्या प्रश्नावर, मी काही बोलू शकत नाही, असे उत्तर त्यांनी दिले आहे. पुढे कोणता आणि काय काळ येणार आहे, हे कोणालाही माहित नाही. परंतु त्यासोबत लढण्याची गरज आहे. आजकाल वातावरणातही बदल होतो आहे. त्यामुळे काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे. आज मुंबईत त्या बोलत होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत का? या प्रश्नावर त्यांनी याबद्दल मी काही बोलू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, मुळात जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा पुरवठा सुरु आहे. राज्यासह (Maharashtra) मुंबईवर (Mumbai) कोरोनाचे सावट पुन्हा एकदा गडद झाले आहे. त्यामुळे काही अंशी लसीची मागणीही वाढली आहे. नागरिकांसाठी आपल्याकडील उपलब्ध लशींचा पुरवठा सुरु आहे. या लशी केंद्राकडूनच (Central Government) येते आहेत. त्यामुळे दोन लशींमध्ये (Covid -19 vaccination)असणार वेळ कमी करायला हवा, असे त्यांनी सुचवले.

यावेळी महापौर पेडणेकर यांनी नागरिकांना कोरोनापासून कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या, १५ वर्षावरील मुलांनाही आपण लस देत आहे. पण याची तपासणी करण गरजेचं आहे. या वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. १५ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी घरोघरी लसीकरण पोचवणे आवश्यक आहे. कारण सध्या ही परिस्थिती चिंताजनक आहे. पण भीतीचं कारण नाही. पण सर्वांना काळजी घ्यावी लागेलं असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT