bribe crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Nashik Bribe Crime News : उदंड जाहली लाचखोरी...राज्यात सर्वाधिक नाशिक विभागात

लाचखोरी रोखण्यासाठी शासनस्तरावरून सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही, लाचखोरीला आळा बसण्याऐवजी लाच घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime News : लाचखोरी रोखण्यासाठी शासनस्तरावरून सातत्याने प्रयत्न केले जात असतानाही, लाचखोरीला आळा बसण्याऐवजी लाच घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आहे. यंदा वर्षभरात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८०३ गुन्हे दाखल करीत १ हजार १७० आरोपींना जेरबंद केले आहे.

यात सर्वाधिक १६३ लाचखोरीचे गुन्हे नाशिक विभागात दाखल झाले आहेत. गत वर्षाच्या तुलनेत राज्यभरातील लाचखोरीत ७० गुन्हे वाढले आहेत. २०२३ मध्ये राज्यात ८०३ गुन्हे दाखल आहेत.(Bribe is highest in state in Nashik division nashik crime news)

२०२३ या वर्षभरात राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ विभागांमध्ये लाचखोरी कमी-अधिक प्रमाणात वाढलेली आहे. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७८६ सापळे रचून १०९८ लाचखोरांना जेरबंद केले.

तर, १२ अपसंपदेच्या प्रकरणात २३ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अन्य भ्रष्टाचाराचे ५ गुन्हयात ४९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. असे राज्यात एकूण ८०३ गुन्ह्यात ११७० आरोपींविरोधात लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ कोटी ५९ लाख ६८ हजार २५५ रुपयांच्या लाचेची रक्कम जप्त केली आहे.

प्रामुख्याने यामध्ये सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हयांमध्ये राज्यात नाशिक विभाग अग्रस्थानी आहे. नाशिक विभागात नाशिकसह, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाने सहकार, भूमी अभिलेख, महसूल आणि शिक्षण विभागातील लाचखोरीत उच्चपदस्थ अधिकार्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटकेची कारवाई केल्याने राज्यभरात गाजावाजा झाला आहे.

२०२३ या वर्षात सर्वाधिक १६० सापळे, एक अपसंपदेचा तर २ अन्य भ्रष्टाचारप्रकरणी असे एकूण १६३ गुन्हे दाखल करीत, २७४ लाचखोरांना जेरबंद केले आहे. गत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३७ लाचखोरीच्या गुन्ह्यांनी वाढ झालेली आहे. यामुळे नवीन वर्षातही ‘लाचलुचपत’च्या नाशिक विभागाचा हाच कित्ता सुरू राहतो की घट होते या येणार्या २०२४ या वर्षातच स्पष्ट होईल.

‘लाचलुचपत’ नाशिक विभाग :

सापळे - १६०

अपसंपदा - १

अन्य भ्रष्टाचार - २

एकूण गुन्हे - १६३

लाचखोरीची राज्याची आकडेवारी

परिक्षेत्र... गुन्हे.... संशयित

मुंबई - ४१ - ५६

ठाणे - १०३ - १४४

पुणे - १५० - २१२

नाशिक - १६३ - २७४

नागपूर - ७५ - ११६

अमरावती - ८६ - १२०

छत्रपती संभाजीनगर - १२५ - १६८

नांदेड - ६० - ८०

एकूण - ८०३ - १,१७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT