Cabinet Expansion News
Cabinet Expansion News Cabinet Expansion News
महाराष्ट्र

Cabinet Expansion : ठरलं! रविवारपर्यंत होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; केसरकर म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : Cabinet Expansion News मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) विस्तार कधी होणार, असाच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. विस्ताराविषयी अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र, विस्तार काही झाला नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी ५ वाजता राजभवनमध्ये होणार असल्याची माहिती साम टीव्हीने दिली आहे. यावेळी १५ ते १६ आमदार शपथ घेणार असल्याचे, सूत्रांकडून समजते. अशात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी विस्ताराबाबत भाष्य केले आहे.

शिंदे गट व भाजपचे सरकार ३० जून रोजी स्थापन झाले. याच दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. या शपथविधीला आज सव्वा महिना झाला आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच विस्तार होणार असेच सांगत आले आहेत.

मात्र, अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळेच विरोधकही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. तुम्ही बरोबर आहात तर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) का करीत नाही, असे प्रश्न विचारत आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार ५ ऑगस्टला होणार असल्याची माहिती आहे. यावेळी १५ ते १६ मंत्री शपथ घेतील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यात भाजपचे ८ तर शिंदे गटाचे ७ मंत्री असतली, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर बुधवारी (ता. ३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सकाळी सुरू झालेली सुनावणी दुपारपर्यंत चालली. दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय न देता गुरुवारी याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यामुळे प्रतीक्षा वाढली आहे. ही सुनावणी अगोदर १ ऑगस्ट रोजी होणार होती, हे विशेष...

आजवर अनेक तारखा

बंडखोर आमदारांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलेला नाही, असे बोलले जात आहे. निर्णयानंतर विस्तार होईल, अशी चर्चा असताना अनेक तारखा वर्तवण्यात आल्या. मात्र, सरकारकडून याबाबद काहीही सांगण्यात आले नाही आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. आता पुन्हा नवीन तारीख सूत्रांकडून मिळाली आहे. ही तरी खरी ठरते की नाही हेच पाहणे बाकी आहे.

दिल्लीवारी वाढली

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अनेकदा दिल्लीचा दौरा केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कसा करावा?, कोणाला किती जागा द्याव्या?, फॉर्मूला काय असणार आदी विषयांवर ते चर्चेसाठी गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. आता शिंदे गटाची यादी निश्चिच झाल्याची माहिती आहे. भाजपची यादी ठरली नसल्यानेच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

दीपक केसरकर म्हणाले...

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारपर्यंत (ता. ७) होईल, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. कोणाला किती पद मिळतील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील, असेही केसरकर म्हणाले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची कोणती तारीख ठरली आहे, हे केसरकर यांनी सांगितले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT