Cancer Institute Sakal
महाराष्ट्र बातम्या

कॅन्सर इन्स्टिट्यूटसंदर्भात मुंबईत बैठक

राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या खेळीतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न रेंगाळत ठेवला.

केवल जीवनतारे

नागपूर : राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या खेळीतून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा (Cancer Institute) प्रश्न रेंगाळत ठेवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सरकार आल्यानेतर नागपुरात दुसऱ्यांदा मेडिकलमध्ये प्रलंबित कॅन्सर इन्‍स्टिट्यूट तयार होईल, असे संकेत दिले गेले असून संस्थेच्या बांधकामाच्या निविदा प्रकाशित झाल्या असून आगामी दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (ता.२९) वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Education Minister Amit Deshmukh) यांनी मंत्रालयात बैठक बोलावली असल्याची माहिती पुढे आली आहे.

मध्यभारतात कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी मेडिकलमधील तत्कालीन कॅन्सररोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांनी दहा ते बारा प्रस्ताव तयार केले होते. पॉवरपॉंईट प्रेझेंटेशन झाले. मात्र कॅन्सर इन्स्टिट्यूट तयार करण्याबाबत मागील सरकार उदासीन होते.

विशेष असे की, बांधकामापुर्वी यंत्रसाठी पैसे देण्याचा अफलातून प्रकार भाजप सरकारने केला होता. यामुळे डॉ. कांबळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने २१ जून २०१७ रोजी दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यात यावे असे निर्देश दिले होते. दै. सकाळ १२ वर्षांपासून कॅन्सर संस्थेचा पाठपुरावा करीत आहे.

२०१९ मध्ये विधानसभेत हा विषय हाताळला असताना नव्यानेच झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत रेंगाळत असलेला कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्‍न निकाली काढत बांधकामाला मंजुरी दिली. नागपूर सुधार प्रन्यासकडे बांधकामाची जबाबदारी दिली. त्यानुसार या विषयावर बांधकामाची दिशा ठरवण्यासाठी मुंबईत बैठक होणार आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण मुंबईतील बैठकीत सहभागी होणार आहेत.

अशी पळवली संस्था...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ सालच्या हिवाळी अधिवेशनात मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाले. २०१५ ते २०१९ या कालावधीत कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याऐवजी मेडिकलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबादला पळवली. न्यायालयाचा अवमान झाल्याने डॉ. कांबळे न्यायालयात गेले. यामुळेच आज मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट आकाराला येण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र नव्याने एक पेच समोर आला आहे.

निविदा प्रकाशित झाल्या असल्या तरी मेडिकलच्या जागेवर उभारलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर इन्स्टिट्यूटशी करार करून मेडिकलमध्ये तयार होणारी कॅन्सर इन्स्टिट्यूट दोन्ही संस्थांचे एकत्रित कार्य करण्याचे मनसूबे तयार होत आहेत. यापुर्वी मेडिकलमध्ये मंजूर झालेल्या कॅन्सर ग्रीडमार्फत ४५ कोटीचा निधी मंजूर झाला होता, तो निधीही पुढाऱ्यांमुळे मेडिकलऐवजी राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर संस्थेला देण्यात आला, अशा अडथळ्यांची शर्यत पार करीत मेडिकलमध्ये ही संस्था उभारली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT