Fire टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

अपघातात कारचं नुकसान; चिडलेल्या चालकाने पेटवला धडकलेला टेम्पो

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार आणि छोटा हत्तीची धडक झाल्याने अपघात घडलाय.

सकाळ डिजिटल टीम

आज पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) कारचा आणि माश्यांची वाहतुक करणाऱ्या छोटा हत्तीची (टेंपो) धडक लागल्याने अपघात घडलाय. यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान सहन न झाल्याने चिडलेल्या कार चालकाने चक्क छोटा हत्ती (टेंपो) पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सातत्याने अपघात होत असतात. अशातच आज पहाटे कारचा आणि छोटा हत्ती (टेंपो) चा अपघात घडला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कार चालक चांगलाच संतापला आणि टेंपो चालकाशी हुज्जत घातली. प्रकरण इथेच थांबले नाही तर कार चालकाने चक्क समोरचा छोटा हत्ती (टेंपो) पेटवला. यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. घटनेची माहिती लोणावळा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT