hasan mushrif critisezes to chandrakant patil in event of zp office kolhapur 
महाराष्ट्र बातम्या

'यामागे हात चंद्रकांत पाटलांचाच!' मुश्रीफांचं पुन्हा प्रत्युत्तर

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यारोप केले होते. माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही. माझं नाव हीच त्यांच्या झोपेसाठी गोळी असेल तर माझी काही हरकत नाही. किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा करणार आहेत, असे म्हटले. पण, ही त्यांची कार्यपद्धती आहे. ते असे दावा ठोकतच असतात. यावेळी ५०० कोटींचा दावा त्यांनी करावा. त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यासाठी लोक वर्गणी काढून पैसे देणार आहेत का? हे पाहावे. त्यासाठी काळा पैसा लागत नाही. त्यासाठी पांढरा पौसाच लागतो. हे पांढरे पैसे मुश्रीफांकडे आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटलांना मुश्रीफांनी उत्तर दिलं आहे.

त्यांनी म्हटलंय की, मी चंद्रकांत पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. माझा आवाज दाबण्यासाठी हेतुपूर्वक प्लॅन केला आहे, असंही ते म्हणाले. शिवाय, हे लोक शिळ्या कढीला मुद्दाम उत आणतायत. सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नाच्या उत्तरावर ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या यंत्रणांचा गैरवापर करुन भीती घातली जातीय. त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. या सगळ्या आरोपांमध्ये नाव केवळ किरीट सोमय्यांचं आहे मात्र, यामागे हात पाटलांचाच आहे. आणि माझा आवाज दाबण्यासाठी हा आरोप केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध माध्यमांतून भ्रष्टाचार आणि घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत तब्बल 2700 पानांचे पुरावे सादर केले. विशेष म्हणजे प्राप्तीकर विभागाकडे आधीच हे पुरावे सादर केल्याचंही सोमय्या म्हणाले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली होती.

मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे, असं म्हटलं होतं. भाजप सत्तेत असताना चंद्रकातं पाटील (chandrakant patil) यांनी घोटाळे केले आहेत. रस्ते घोटाळ्या प्रकरणी चंद्रकातदादा पाटील यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करणार आहे. त्याबाबतचे पुरवा देणार आहे. त्यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफांवर टीका केली होती.

महाराष्ट्रात ऐतिहासिक हॅम नावाचा प्रोजेक्ट आहे. तो मी आणला. ९ हजार कोटींचा प्रोजेक्ट मी आणला. त्याचे उद्घाटन हे सरकार फिरत आहे. माझ्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचे सर्व पॅकेज उचलले गेले. आता त्या हॅममध्ये घोटाळा आहे? असे वाटत असेल तर त्यांना १९ महिन्यांनी जाग आली का. आतापर्यंत ते झोपा काढत होते का? १९ महिन्यांनी त्यांना साक्षात्कार झालाय. अशा प्रकारे त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल ते करू शकतात. मला काही अडचण नाही. मी धमक्यांना घाबरत नहाी. तुमची काही चूक नसेल तर तुम्ही घाबरचा कशाला? असेही पाटील म्हणाले.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, असे मुश्रीफांनी म्हटलेय. त्यावरही पाटलांनी भाष्य केले आहे. तुम्ही खूप खमके आहात. तुम्ही एकमेकांना फेविकॉल फेविकॉल लावले आहे. ते हलविण्याचा कोणाचा अधिकार नाही. कामाच्या वाटणीमध्ये आरोप करण्याचे काम किरीट सोमय्यांकडे दिले आहे. त्यामुळे पुढचे नाव कोणाचे आहे? हे तेच चांगल्याने सांगू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT