चंद्रकांत पाटील गुगल
महाराष्ट्र बातम्या

'शिव-शाहूंची परंपरा असलेल्या कुणीतरी मराठा आरक्षणासाठी पुढं यावं लागेल'

आम्ही यापुढेही संभाजीराजे यांच्या नेतृत्वाला पाठींबा देणार - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

आम्ही यापुढेही संभाजीराजे यांच्या नेतृत्वाला पाठींबा देणार - चंद्रकांत पाटील

संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती किंवा उदयनराजे भोसले असे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूराजेंची वारसा, परंपरा असणाऱ्या कुणालातरी मराठा आरक्षणाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरावं लागेल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) प्रतिक्रिया देताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, राज्य सरकारने सारथीची वाट लावली. अण्णासाहेब पाटील महामंडळाची आजची स्थिती सर्वांना माहिती आहे. राज्यातील बरीच हॉस्टेल बंद आहेत. जे ओबीसीला ते मराठ्यांना हे देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलं होतं, मात्र आता सगळं बंद झालं आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकरामध्ये सारथीअंतर्गत कर्ज योजना सुरु होत्या. निम्मी फी भरली जातं होती. मात्र आता हे सर्व ठप्प झालं आहे. मराठा आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. यापुढेही संभाजीराजे यांच्या नेतृत्वाला भाजपा (BJP) पाठींबा देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आजच्या पत्रकार परिषदेविषयी ते म्हणाले, संजय राऊत यांनी बोलण महाराष्ट्राला नवीन नाही. काय आरोप करतील हेच माहिती नाही. ते मुंबई आणि महाराष्ट्र स्वत:चा म्हणतात. त्यामुळे ते बोलतील तेव्हा पाहूया. देशात प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य माणसांवर त्यांनी अधिकार केव्हापासून गाजवायला सुरुवात केली हे माहिती नाही.परंतु असे वातावरण निर्माण करायची त्यांना सवय आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही वेगळ असेल तर मी प्रतिक्रिया देईन असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT