Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'केंद्राने ट्रेन पाठवल्या तरी त्या रिकाम्या पाठवण्याची जबाबदारी तुमची होती'

नरेंद्र मोदी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

नरेंद्र मोदी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे - चंद्रकांत पाटील

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केलेल्या टीकेवरून सध्या राजकीय नेत्यांत टोलेबाजी सुरु आहे. भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पहायला मिळत आहेत. दरम्यान आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांवर (PM Modi) केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी नरेंद्र मोदी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे, अस चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच या रेल्वे केंद्राने सोडल्या असतील तरी ती तुमची जबाबदारी होती की या रेल्वे रिकाम्या जातील. तसा विश्वास तुम्ही द्यायला हवा होता की लॉकडाऊन झाला तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमचं पोट भरु, काळजी करु, हा कॉन्फिडन्स सरकारने मजुरांना दिला नाही, त्यामुळे हेच सरकार दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

पुणे येथे प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aaghadi Sarkar) मंत्र्यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तरी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) नेमकं काय म्हणाले, हे लोकांना नीट समजलं आहे. आपापल्या राज्यात असलेल्या नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपली जबाबदारी झटकणाऱ्या लोकांवरच नरेंद्र मोदींनी हे विधान केले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना (Covid -19) काळात राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झाली आणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Govt.) काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात परप्रांतातून आलेल्या लोकांना आम्ही तुमची काळजी घेऊ, असा आत्मविश्वासही महाविकास आघाडी सरकार देऊ शकलं नाही. हेच त्यांचं अपयश आहे. मोदीजींनी देशभरातील लोकांना सर्व सुविधा दिल्या, मात्र तुम्ही काय दिलं? महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळेच ट्रेन सोडण्यात आल्या असेही ते म्हणाले. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते मला आश्चर्य वाटलं तुमच्या बोलण्यात राऊत अजून कसे आले नाहीत, राऊत आलेच पाहिजेत त्याच्याशिवाय आपला इंटरव्ह्यू संपत नाही त्यामुळे नमस्कार, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune E-Bus Project: ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच एक हजार ‘इ बस’; राज्य सरकारकडून अखेर हमी, पाच महिन्यांत दाखल होणार

IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स

Whatsapp ला आलं 'सायबर कवच'! ऑन करताच हॅकर्सना बसणार दणका; Strict Account फीचरने फ्रॉड कॉल्सचा प्रॉब्लेम संपवणार, एकदा वापरुन बघाच

Latest Marathi Breaking News Live: मी कालही चुकीचं केलं नाही, पुढेही करणार नाही - अजित पवार

Flight Mode फक्त विमान प्रवासासाठी नाही! जाणून घ्या फोनसाठी कसे ठरते फायदेशीर?

SCROLL FOR NEXT