Chhagan Bhujbal Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar in Yeola: येवल्यात ते पहिल्यांदा आले कारण.. भुजबळांचे पवारांच्या सभेवर टीकास्र

Sharad Pawar Speech: शरद पवार यांनी पक्षबांधणीसाठी जनतेत उतरणार असल्याची घोषणा केल्यानंतर येवल्यात पहिली सभा घेतली. शरद पवारांच्या या सभेवर छगन भुजबळ यांनी टीका केली.

सकाळ डिजिटल टीम

Chhagan Bhujbal reacted on Sharad Pawar: अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. अजित पवारांनी पक्षावर दावा केल्यानंतर शरद पवार यांनी कायद्याचा आधार न घेता राष्ट्रवादी कॉंग्रसे पक्ष कोणाचा हे थेट जनताच ठरवेन अशी भूमिका घेतली.

शरद पवार पक्षबांधणीसाठी जनतेत उतरणार असल्याची घोषणा केल्यानंतर येवल्यात पहिली सभा घेतली. शरद पवारांच्या या सभेवर छगन भुजबळ यांनी टीका केली.

छगन भुजबळ इगतपुरीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "पवार साहेंबाचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्ष जेव्हा तयार झाला, तेव्हा पक्ष उभारणीसाठी पहिला नेता उभा राहिला, तो म्हणजे छगन भुजबळ. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत होतो म्हणून माझा पहिला नंबर."

यापुढे ते म्हणाले की , "येवल्यात ते पहिल्यांदा आलेत कारण त्यांचं भुजबळांवर प्रेम अधिक आहे." एवढचं नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेबाबत छगन भुजबळ म्हणाले की पक्षाचं नाव, चिन्ह हे त्यांच्या रामटेक बंगल्यावर झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं.

यावेळी माध्यमांकडून प्रश्न करण्यात आला होता की शरद पवार यांच्या सभेचं आव्हान वाटतं का? यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की साहेब सभेत देणार नाहीत, दिला तर उपदेश देतील.

छगन भुजबळ यांनी यावेळी कांद्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. इतर मुद्यांवर रविवारी (दि.९ जुलै) बोलू असे वक्तव्य त्यांनी केले. शरद पवार यांच्या सभेला प्रतिसभा न घेण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

शरद पवार यांनी येवल्यात रविवारी सभा घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT