Crime News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Crime News: धक्कादायक! मांत्रिकाच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू; मुलावर भूतबाधा...

इरळी गावातील प्रकार; कर्नाटकातील शिरगूरच्या मांत्रिकावर गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एका चौदावर्षीय शाळकरी मुलाचा कर्नाटकातील शिरगूर (ता. रायबाग) येथील मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याने भूतबाधा उतरवण्यासाठी केलल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. आर्यन दीपक लांडगे असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मृत मुलाची आई कविता (३५) यांनी आज सायंकाळी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आर्यन बहीण अस्मितासह उन्हाळी सुटीसाठी मामाच्या गावी शिवनूर (ता. अथणी) येथे गेला होता. समवेत त्याची आईही होती. त्याआधी आर्यनची तब्येत बिघडल्याने १३ रोजी सुभाषनगर (ता. मिरज) येथील खासगी दवाखान्यात दाखवले होते. तिथून श्रीमती कविता माहेरी गेल्या.

तेथेही आर्यनची तब्येत बिघडल्याने शेजारच्या एका महिलेने शिरगूर (ता. रायबाग) येथील मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. श्रीमती कविता यांना अडचण होती म्हणून त्यांनी भावासह मुलास १८ रोजी मांत्रिकाकडे पाठवले. नातेवाइकांनी मांत्रिकाकडे नेले असता त्याने आर्यनच्या गालावर, मांडीवर, पाठीवर अमानुष मारहाण केली.

त्या अवस्थेत आर्यनला अथणी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सांगितल्याने मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्याचा शुक्रवारी (ता. १९) उपचारांदरम्यान रात्री दहा वाजता मृत्यू झाला. त्यानंतर मिरजेत महात्मा गांधी पोलिस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली.

त्यानंतर आज हा प्रकार समजल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी गावी जाऊन नातेवाइकांची भेट घेऊन आधार दिला. त्यावेळी नातेवाइकांशी चर्चा करून आर्यनचा मृत्यू मांत्रिकाच्या मारहाणीमुळेच झाल्याचे दिसते. त्यामुळे संबंधित मांत्रिकावर कठोर कारवाई करावी.

कवठेमहांकाळ ठाण्याचे सहायक निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे समितीच्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणे मांडताच त्यांनी तत्काळ आर्यनच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. तिचे म्हणणे ऐकून घेऊन फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित गुन्हा कुडची पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तेथील पोलिसांकडे वर्ग केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

आर्यनच्या नातलगांशी चर्चा केली असता मांत्रिकाच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्याची रीतसर फिर्याद दाखल झाली आहे. आम्ही कर्नाटक पोलिसांचीही भेट घेणार आहोत. कर्नाटकातही महाराष्ट्राप्रमाणे जादूटोणाविरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

— फारुक गवंडी, अंनिस, कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT