school students sakal
महाराष्ट्र बातम्या

मुलांना सांगता येईना देशाचा स्वातंत्र्यदिन! शिक्षकांना आता शाळेत मोबाईल बंदी

पहिली ते पाचवीतील मुलांना अजूनही देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो, हे सुद्धा सांगता येत नसल्याची स्थिती आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढून सर्व विद्यार्थी स्पर्धाक्षम बनावेत, या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा तयार केला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पहिली ते पाचवीतील मुलांना अजूनही देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन कधी असतो, हे सुद्धा सांगता येत नसल्याची स्थिती आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांची गुणवत्ता वाढावी, कोरोना काळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढून सर्व विद्यार्थी स्पर्धाक्षम बनावेत, या हेतूने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्याचा कृती आराखडा तयार केला आहे.

शहरात पहिली ते आठवीच्या २२१ तर ग्रामीणमध्ये तीन हजार ७४६ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये तीन लाखांवर विद्यार्थी आहेत. प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का झाल्यानंतर मुलांना पुढील शिक्षणासाठी कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे आता विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकांवर सोपविली जाणार आहे. तत्पूर्वी, शाळांना सुटी लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक व शिक्षकांची निबंध स्पर्धा घेतली होती. त्यातील जवळपास १०० निबंधांचे वाचन दिलीप स्वामी यांनी केले आहे. गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुचविलेल्या कल्पनांवर आधारित एक कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्याची सुरवात मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेपासून होणार आहे. दरम्यान, गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास निश्चितपणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त केला आहे.

शिक्षकांच्या मोबाईल वापरावर निर्बंध

शाळेच्या वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यावर आता निर्बंध लागू केले जाणार आहेत. शाळेच्या सुटीतच शिक्षकांना मोबाईल वापरता येणार आहे. मुलांना अध्यापन करत असताना शिक्षक मोबाईल वापरू शकत नाहीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या माध्यमातून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यावर शाळा व्यवस्थापन समिती वॉच ठेवेल, असेही त्यांनी सांगितले. मुलांना शिकवताना त्यात व्यत्यय नको म्हणून हा आदेश नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे.

उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर

शाळांना सुटी लागण्यापूर्वी काही शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी मुलांना देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन देखील माहिती नसल्याची वस्तुस्थिती पाहायला मिळाली. कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक असेल.

- दिलीप स्वामी, मुख्यकार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद

शाळा व्यवस्थापन समितीत होणार बदल

मुलांची गुणवत्ता वाढावी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने प्रत्येक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती नेमली जाते. पण, अलीकडे या समित्यांच्या निवडीत मोठ्या प्रमाणावर राजकारण होऊ लागले आहे. काही ठिकाणी समित्यांची निवड करताना मतदान घ्यावे लागले, हे विशेष. त्यामुळे आता ज्या पालकांच्या मुलांना मागील शैक्षणिक वर्षात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत, त्या मुलांच्याच पालकांचा शाळा व्यवस्थापन समितीत समावेश असणार आहे. पालकांनी राजकारणापेक्षा मुलांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, हा त्यामागील हेतू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT