Chitra Wagh sakal
महाराष्ट्र बातम्या

'मदतीच्या नावाखाली चित्रा वाघ राजकीय पोळी भाजून घेतात'

आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचं काम चित्रा वाघ करतात.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीतेने भाजप नेत्या चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला कुचिक यांच्याविरुद्ध जबदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. यानंतर राजकिय वातावरण चांगलच तापलं आहे. दरम्यान,राष्ट्रवादी युवती संघटनेकडून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने (NCP) केली आहे. आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचं काम चित्रा वाघ करतात अशी टीका ही देखील आंदोलनकर्त्यांनी केली.

अनेक राजकीय नेत्यांच्या विषयी आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचं, त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचं काम चित्रा वाघ करत आहेत. मदतीच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या करतात. प्रसिद्धीसाठी चित्रा वाघ स्टंट करतात हे अतिशय भयंकर असून, त्यांच्या या वागण्यामुळे राजकारणात, समाजकारणात काम करणाऱ्या महिलांची नामुष्की झाली आहे असाही आरोप राष्ट्रवादी युवती संघटनेकडून करण्यात आला.

चित्रा वाघ यांच्या वागण्यामुळे महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असेही कार्यकर्त्या म्हणाल्या, राजकारणात अशा पद्धतीचे वर्तणूक, नेतागिरी त्यांनी करू नये अशीही विनंती यावेळी करण्यात आली. अजून किती मुलींच्या बाबतीत त्यांनी अशा पद्धतीची वर्तणूक केली आहे याचा तपास करण्याची तक्रार पोलिसांकडे आणि महिला आयोगाकडे करणार असल्याचेही कार्यकर्त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT