Floor Test in Maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

माझी टिंगल करणाऱ्यांचा बदला घेणार, फडणवीसांनी सभागृहातच सुनावलं

धनश्री ओतारी

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यानंतर भाषणादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार असा इशारा टिकाकारांना दिला.(Floor Test in Maharashtra)

शिवसेना भाजप युतीचे आमचे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. असे म्हणत फडणवीस यांनी सभागृहात आपल्या भाषणाची सुरूवात केली. यादरम्यान त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला.(Eknath shinde-Devendra Fadnavis Floor test)

मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो. यांना सोबत घेऊन आलो.

ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते. असे म्हणत, दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते... कोशिश करने से हर मुश्किल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नही जाते.. अशा शब्दात फडणवीस यांनी टीकाकारांना उत्तर दिले.

राज्यपालांच्या निर्देशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गट आणि भाजपाने १६४ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

Nicolas Sarkozy: फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझींना ५ वर्षांची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? वाचा...

SCROLL FOR NEXT