esakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंनी सानुग्रह अनुदानात केली वाढ

रुपेश नामदास

राज्यातल्या संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानात वाढ केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली होती की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार. त्यानंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं होतं. राज्य सरकारने आज सानुग्रह अनुदानात वाढ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचे ५० रूपये देण्याची घोषणा केली आहे.

सानुग्रह अनुदान देताना मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांद्याच्या प्रश्नावरुन सरकारला जाब विचारला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली होती. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भारताच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ४३ टक्के वाटा हा आपल्या राज्याचा आहे."

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "बाजारात लाल कांद्याची आवक जास्त आहे. देशातल्या इतर राज्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळेच आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी समिती नेमली. यामध्ये निर्णय झाल्याप्रमाणे आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देत आहोत. २०० रुपयेची शिफारस होती, पण आम्ही ३०० रुपये देत आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT