Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM शिंदे वेळ पाळत नाहीत म्हणून फडणवीस रुसले? मतभेद चव्हाट्यावर

एकत्र कार्यक्रम नियोजित असूनही दोघांनी एकमेकांसमोर येणं टाळलेलं दिसून आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे सरकार स्थापनेपासून सतत एकत्र दिसून आले आहेत. सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत, दौऱ्यांवर एकमेकांसोबत असलेले पाहायला मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद असल्याचं समोर येत आहे. दोघे एकमेकांसोबत एकाच मंचावर येणं टाळत असल्याचं आढळून आलं आहे.

रविवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे तीन कार्यक्रम एकत्र होते. मात्र एकाही कार्यक्रमाला हे दोघे एकत्र आले नाहीत. हे कार्यक्रम टाळून मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातल्या एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेले. दिवसभर ते तिथेच होते. पुढे देवेंद्र फडणवीस ठाण्यातल्या एका कार्यक्रमाला आले. तिथेही एकनाथ शिंदे ठाण्यात असून गेले नाहीत. त्यामुळे यांच्यातल्या मतभेदांची चर्चा आहे.

पोलिसांच्या बदल्यांमुळे नाराजी?

शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक झाली. या बैठकीत पोलिसांच्या बदल्यांविषयी चर्चा झाली. त्यामध्ये या दोघांमध्ये वाजल्याची चर्चा आहे. सरकार येऊन आता शंभरहून अधिक दिवस लोडले. पण तरीही अजून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न सुटला नाही, तसंच मुख्यमंत्री वेळ पाळत नाहीत, या मुद्द्यांवरुन देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT