शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 
महाराष्ट्र बातम्या

उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करु शकतात - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. कोरोना पार्श्वभूमी आणि राज्यातील पूरस्थितीमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येकाला आपला कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री वाटने, हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. हे नेतृत्व दिर्घकाळ टिकेल. आणि या नेतृत्वाकडून राष्ट्रालाही भविष्यात आपेक्षा आहेत, असं माझं मत आहे. मी पुन्हा एकदा अधोरिखित करतोय की, राष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदूत्ववादी नेतृत्वाची गरज जर भविष्यात जर लागली तर ते नेतृत्व करण्यात सक्षम आहेत आणि ते करतील. याची मला खात्री आहे. या शुभेच्छा मी आज देतोय, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेते आशिष शेलार आज तळीये आणि चिपळून दौऱ्यावर आहेत. राज्यपालांच्या या दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पूरग्रस्त भागात राजकीय पर्यटन नको, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज्यपाल आणि विरोधकांना लगावला आहे. जगभरामध्ये जेव्हा अशा प्रकराच्या दुर्घटना घडतात तेव्हा सर्वात आधी बचावकार्य सुरु होतं. त्या बचावकार्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत. हा एक नियम आहे. पण महाराष्ट्रात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा शक्य तो आरोप-प्रत्यारोप करणे, राजकीय दौरे करणे. तिथे जाऊन आधिकाऱ्यांवरती आरोप करणे, ओरडणे हल्ले करणे, असे प्रकार थांबले पाहिजेत. प्रत्येक जण मनापासून, महाराष्ट्र आपला आहे, कोकण आपला आहे, सातारा सातारा सांगली ती माणसे आपली आहे, प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मदत करावी, आपण त्यातून काही लोकांचा बचाव करू शकलो तर करावा, ही काही श्रेयाची लढाई नाही, हा श्रेयवाद नाही, जर कोणाला असे वाटत असेल तर ते माणुसकीशून्य काम करत आहेत, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, आपल्या जनतेला सर्व प्रकारचे सहाय्य आणि मदत करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत, पण केंद्राची जबाबदारी आहे, महाराष्ट्र केंद्राला सर्वाधिक कर देते तुम्हाला, विशेषतः मुंबई, आम्ही काय आता हिशोब मागायला बसलो नाही पण केंद्र आमचा बाप आहे, महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहे, त्यांनी काही घोषणा केलेली आहे, त्यांनी येताना दोन हजार कोटीचा चेक घेऊन यावा केंद्राकडून, नरेंद्र मोदी साहेबांची सही असलेला चेक घेऊन यावा एखादा, जर तो त्यांनी आणला तर नक्की आम्ही त्यांचे वाजत गाजत स्वागत करू आणि कोकण आणि सातारा सांगलीच्या जनतेला सुपूर्त करू,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू, १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नेमके काय केले बदल?

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडून अत्याचार

India Exports: भारताच्या निर्यातीत ऐतिहासिक उच्चांक! ८६३ अब्ज डॉलरचे उत्पन्न, सेवा क्षेत्राचे मोठे योगदान, ‘सेवा निर्यात महासत्ता’ सिद्ध

विजय सरकार स्थापन करणार की राष्ट्रपती राजवट? राज्यपालांच्या एका निर्णयाकडे देशाचं लक्ष, आतापर्यंत अशा परिस्थितीत काय घडलं?

Thalapathy Vijay Opposition Leader Tamil Nadu : विजय थलपती मुख्यमंत्री नाही तर विरोधी पक्षनेता होणार?, भाजपकडून करेक्ट कार्यक्रम; तमिळनाडूचा रिमोट कंट्रोल मोदींच्या हाती

SCROLL FOR NEXT