politics
politics sakal
महाराष्ट्र

उमेदवार माघारीसाठी काँग्रेसचे भाजपला साकडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यसभेची पोटनिवडणुक टाळण्याच्या हेतूने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली; या निवडणुकीतून भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याचा आग्रह धरला. ‘प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कोअर कमिटीतील सदस्यांशी चर्चा करून निर्णय कळवू,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत भाजपलाही मदत करू, पण निवडणूक नकोच, अशी भूमिका पटोले, थोरात यांनी घेतली. राजीव सातव यांच्या निधनामुळे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अशा पोटनिवडणुका बिनविरोध करणाऱ्याची परंपरा असल्याचे सांगत, भापजने माघार घेण्याची अपेक्षा काँग्रेस नेत्यांची आहे. तरीही भाजपने उपाध्याय यांचा अर्ज भरल्याने निवडणूक होण्याचे संकेत आहेत. ‘पक्षातील वरिष्ठांचा निवडणूक लढण्याची आग्रह असल्याने माघार नाही,’ असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर पटोले आणि थोरात यांनी फडणवीस यांची यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भेट घेतली.

सदस्यांच्या निधनाने होणाऱ्या पोटनिवडणुकांत विरोधकांचा उमेदवार नसतो. त्याच उद्देशाने फडणवीस यांची भेट घेतली. ही निवडणूक होऊ नये, अशी मागणी आहे. त्यावर तूर्तास तरी विचार करून निर्णय घेण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत असेल. यापुढच्या काळात भाजपला अशाच स्वरूपाच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल.

-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT