Congress Party Congress Party
महाराष्ट्र बातम्या

'काँग्रेस सरकारचा महत्वाचा भाग, मुद्दा लक्षात ठेवून सरकार चालवावे'

काँग्रेस प्रदेश प्रभारी यांची राज्यातील काँग्रेस नेत्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. सत्ताधारी विरोधक यांच्यात अनेक कारणांवरून टोलेबाजी सुरु आहे. मात्र तरीही अगामी निवडणुकासांठी पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आता काँग्रेस प्रदेश प्रभारी यांची राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी संघटनात्मक बांधणीवरून असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात एच. के. पाटील (H.K. Patil) यांची काँग्रेस नेत्यांसोबत आढावा बैठक झाली आहे.

दरम्यान, पाटील यांनी डिजिटल नोंदणीसह पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरही नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पाटील म्हणाले, राष्ट्रवादीला (NCP) विकास निधीत जास्त वाटा मिळत असल्याने कॉंग्रेसच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी सत्तेत असून पक्ष संघटनेकडे लक्ष देत आहे. काँग्रेसने प्रदेश पातळीवर अधिकचे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई काँग्रेसने अधिक मजबूत संघटना बांधणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत. काँग्रेस पक्ष हा सरकारचा महत्वाचा भाग आहे त्यामुळी हा मुद्दा लक्षात ठेवून सरकार चालवावे अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या असल्याचे समजते आहे.

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारून पराभव झाला आहे. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस नेते चांगलेचं हादरले आहेत. दरम्यान, आता देशासह राज्यातील वरिष्ठांपासून सर्वजण पुन्हा एकदा या पराभवाच्या मागील कारणे शोधताना दिसत आहेत. त्यासाठी बैठका, गाठीभेटी आणि बातचित सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT