congress Sachin sawant reaction on devendra fadanvis on ayodhya babri and Kashmir remark  Sakal
महाराष्ट्र बातम्या

जर मोदी तुरुंगात जाऊ शकतात तर फडणवीसही....; सचिन सावंतांची टीका

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांची मुंबईत आज उत्तर सभा झाली, या सभेत फडणवीसांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, या भाषणात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं यावर कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, "मोदीजी बांगलादेश मुक्ती संग्रामात जेलमध्ये गेले, ट्रेनमध्ये चहा विकत होते, असे तुम्ही मानले ना! गटारातून गॅस निघालेला पाहिलाय ना!, मग फडणवीसजी बदायूं जेलमध्ये गेले आणि १९ व्या वर्षी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी गेले, हे मान्य करायला काय हरकत आहे?" अशा खोचक शब्दात त्यांनी टीका केली आहे.

फडणवीस काय म्हणाले?

आजच्या मुंबईतील सभेतबाबरी मशिद प्रकरणावर बोलताना बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, अयोध्येमध्ये केवळ फडणवीस गेलाच नव्हता तर, बदायुंच्या तुरुंगातही होता. तेव्हा आम्ही वाट पहायचो की, कोणीतरी शिवसेनेवाला येईल पण कोणीही आलं नाही. एवढचं नाही त्यापूर्वी १९व्या वर्षी हिंदुंवर अत्याचार होत होता तेव्हा विद्यार्थी परिषदेसोबत जाऊन तिथं काश्मिरींचं मनोबल वाचवण्यासाठी गेलो होतो. आम्ही फाईव्हस्टारचं राजकारण केलं नाही जमिनीवरच राजकारण केलं, असे म्हणाले होते. त्यावर सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT