congress will give surprise candidate against CM Devendra Fadnavis for maharashtar vidhansabha elections 2018
congress will give surprise candidate against CM Devendra Fadnavis for maharashtar vidhansabha elections 2018 
महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचा "सरप्राइज' उमेदवार?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण लढणार, असा प्रश्‍न सध्या उपस्थित केला जात आहे. अनेकांनी आधीच लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उमेदवाराबाबतचे गूढ आणखीच वाढले आहे. असे असले तरी येथून देवेंद्र फडणवीस यांना सरप्राइज देणार असल्याचे संकेत कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात याच मतदारसंघात यापूर्वी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे लढले आहेत. मात्र, दोघांनाही पराभव पत्करावा लागला. विकास ठाकरे यांनी यापूर्वीच पश्‍चिमेची वाट धरली आहे. प्रफुल्ल गुडधे यांनी मागील निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली होती. आता पुन्हा सलग पराभवाचा ठप्पा लागू नये, याकरिता तेही पश्‍चिम नागपूरला पसंती देत आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी, असा प्रश्‍न कॉंग्रेसला पडला आहे. एखाद्या सक्षम उमेदवाराच्या शोधात कॉंग्रेस आहे. याकरिता विविध नावांवर चर्चा सुरू आहे. येथील मतदारांची संख्या लक्षात घेता साहजिकच कुणबी समाजाला येथे प्राधान्य दिले जाणार आहे. यापूर्वीचे दोन्ही उमेदवार कुणबीच होते. त्यामुळे कुणबी फॅक्‍टर कितपत चालेल, याविषयी शंका आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही नाना पटोले यांना या मतदारसंघातून मोठी आशा होती. त्यांनी जाणीवपूर्वक "ओबीसीं'ना मतदान करा, असे भावनिक आवाहन केले होते. यानंतरही येथून कॉंग्रेसला मताधिक्‍य मिळवता आलेले नाही.

कॉंग्रेसकडे मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकेल, असा सक्षम उमेदवार दक्षिण-पश्‍चिमेत नाही. त्यामुळे येथून उमेदवार बाहेरून आयात केला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काटोल किंवा पश्‍चिम नागपूरमधील कॉंग्रेसचा सरप्राइज उमेदवार राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT