Balasaheb Patil vs Pravin Darekar esakal
महाराष्ट्र बातम्या

सहकार विभागाचा 'पेनड्राईव्ह' देण्यानं फरक पडणार नाही : सहकारमंत्री पाटील

हेमंत पवार

'दरेकरांवर राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडीची भूमिका नाही.'

कऱ्हाड (सातारा) : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर केलेल्या कारवाईत राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची भूमिका निश्चित नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. सहकारी संस्था चांगल्या चालल्या आहेत. मात्र, तरीही मोघम बोलणं योग्य नाही. सहकार विभागाचा पेनड्राईव्ह (Pendrive) देण्यामुळं फारसा फरक पडणार नाही. तो दिल्यास आम्ही चौकशी करु, असं स्पष्टीकरण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दरेकर यांच्या आरोपवर दिलंय.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दरेकर यांनी साताऱ्यात सहकारी संस्थातील भ्रष्टाचारासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्याचा संदर्भ घेवून सहकारमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, मुंबई जिल्हा बॅंकेवर (Mumbai District Bank) विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अध्यक्ष म्हणून काम पहात होते. ते मजूर संस्थांतून निवडून येत होते. त्याबाबत त्यांची तक्रार करण्यात आली. त्याची सहकार विभागाच्या वतीने चौकशी झाल्यावर त्यांना मजूर म्हणून अपात्र जाहीर केलंय. त्यांनी दोन मतदार संघातून अर्ज भरले होते. निवडून आलेल्या मतदार संघातील अर्ज ठेवून दुसऱ्या ठिकाणचा राजीनामा दिला. ही परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांच्याबद्दल आप पक्षाच्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडं तक्रार केली. त्यामध्ये त्यांनी मजूर या व्याखेत बसून अनेक वर्षे मुंबई जिल्हा बॅंकेवर काम केलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

श्री. दरेकर हे विधान परिषदेला उभे राहताना व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. हा गुन्हा आहे, असं लक्षात आल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये राजकीय सूड उगवण्याची महाविकास आघाडी सरकाची (Mahavikas Aghadi Government) भूमिका निश्चित नाही. मात्र, काही मंडळी येतात आणि वल्गना करतात. मुळात मजूर या कॅटगरीत अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गुन्हा घडला याची चौकशी सुरु आहे. त्यामुळं गृह विभाग आणि सहकार विभागाकडून हा गुन्हा दाखल केलेला आहे.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, ज्यावेळी ते मजूर संस्थेत आले त्यावेळी त्यांनी रंगारी असं दाखवलं आहे. त्यासाठीचा मोबदला त्यांनी चेकनं न घेता रोख घेतला आहे. त्याच दरम्यानच्या काळात अधिवेशनही सुरु होतं. त्यामुळं मोबदला कसा घेतला हा संशोधनाचा भाग आहे. महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे (Maharashtra Co-operative Society) जाळे मोठे आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जाळे मोठे आहे. दरेकर यांनी सहकारात काम करताना मजूर म्हणून ते अनेक वर्षे त्या संस्थेवर गेले. त्याची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. त्याबद्दल काहीही हकरत नाही. सहकारी संस्था चांगल्या चालल्या आहेत. मात्र, तरीही तक्रार करायची असेल तर काहीही हरकत नाही. त्यांनी खोट्या कर्जांची माहिती दिल्यास चौकशी करु. मात्र, मोघम बोलणं योग्य नाही. सहकार विभागाचाही पेनड्राईव्ह देण्यामुळं फारसा फरक पडणार नाही, तरीही आम्ही त्याची चौकशी करु, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT