Corona patient 
महाराष्ट्र बातम्या

संक्रमणात मुंबई दुसऱ्या तर पुणे दहाव्या क्रमांकावर

नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. पण धोका अद्याप कायम आहे. देशातील कोरोना संक्रमणावर पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थाने (Indian Institute of Science Education and Research, IISER) एक रिसर्च केला आहे. कोरोना संसर्गासाठी भारतातील सर्वात धोकादायक शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई दुसऱ्या तर पुणे दहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तब्बल 446 शहरांमध्ये संक्रमणाचं संशोधन केलं आहे. कोरोना महामारीचा प्रादर्भाव वेगानं होणाऱ्या ठिकाणी पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेनं आपलं संशोधन केलं आहे.

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या रिसर्चनुसार, या यादीत दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीमध्ये संक्रमण सर्वात वेगानं होऊ शकतं, असं संशोधनातून दिसून आलं. दिल्लीनंतर मुंबई, कोलकाता, बेंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांचा क्रमांक लागतो. पुणे या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या फिजिक्स विभागानं ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क आणि मोबईल पॅटर्नच्या आधारावर धोकादायक शहरांचं मॅप तयार केल आहे. यामध्ये सर्वात कमी आणि जास्त धोकादायक शहरांची यादी काढली आहे.

संशोधकांच्या मते, या शहरांमधून कोरोना महामारीचं संक्रमण इतर शहरात पोहचलं आहे. कारण या शहरात मोठ्या प्रमाणात दळवळण आहे. ही शहरं जोडली गेलेली आहेत. तसेच प्रमुख वाहतूक केंद्रही आहेत. त्यामुळेच या शहरातून कोरोनाचा संसर्ग इतर शहरांपर्यंत पोहचला आहे. प्रमुख संशोधक एम.एस. संथानम म्हणाले की, संक्रमणाचा उद्रेक प्रमुख शहरांमधूनच झाला आहे. शहरातील वेगवाग वाहतूकीमुळे रोगाचं संक्रमण आधिक वेगानं झालं आहे. कोरोना अथवा इतर रोग मोठ्या शहरांमधून वाहतूकीमार्गे लहान शहरात जात असल्याचं संशोधनात स्पष्ट झालं आहे. ओंकार सदेकर म्हणाले की, महामारीच्या संक्रमणाला लोकच जबाबदार आहेत. लोकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव शहरातून गावखेड्यात पोहचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवारांच्या राज्यसभेसाठी लेकीची फिल्डिंग! संजय राऊतांशी चर्चा, खर्गे आणि उद्धव ठाकरेंना भेटणार सुप्रिया सुळे

Toll tax on Indian Army: भारतात सैनिकांना टोल टॅक्समधून सूट मिळते का? जाणून घ्या नियम काय सांगतो

Latest Marathi News Live Update : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणूक बिनविरोध, भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या

BMC Budget: राज्याने थकविले १५ हजार कोटी, महापालिकेची आता ठेवींवर मदार

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

SCROLL FOR NEXT