Goutami Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घाला अन् ... सामाजिक संघटनेची मागणी

दिलखेचक अदा आणि आपल्या डान्समुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

दिलखेचक अदा आणि आपल्या डान्समुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमामध्ये नृत्य कमी आणि अश्लीलता जास्त असल्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर राज्यभरात कायमस्वरुपीची बंदी घालण्यात यावी तर त्याचबरोबर तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

मिरज तालुक्यातील बेडग येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान कार्यक्रमाच्या जवळच दत्तात्रय ओमासे याच्या मृत्यूस गौतमी पाटील कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत लक्ष्मण सदामते यांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. या संबधीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत गौतमी अश्लील नृत्य सादर करते. तिचे अश्लील हावभव आणि नृत्य यांचे व्हिडीओ वेगवेगळ्या अॅपद्वारे घराघरात पोहोचतात. हे सर्व व्हिडिओ माता, भगिणी व लहान मुले-मुली पाहतात. यांच्यावर या व्हिडिओचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमी पाटील यांचे अश्लील नृत्य करणाऱ्या कार्यक्रमांवरच बंदी घालण्यात यावी, अशी मागणी प्रशांत सदामते यांनी केली आहे.

राज्यात अनेक लावणी कलावंत आणि कलाप्रेमी वारंवार गौतमी पाटीलवर टीका करत असतात. तिच्या या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत असते. अशातच आता तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागण्यामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT