Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis addressing media on PM CARES Fund, Navi Mumbai Airport, and farmers’ loan waiver issues.

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : 'पीएम केअर फंड'बाबत फडणवीसांनी सोडलं मौन अन् विरोधकांनाही लगावला टोला , म्हणाले...

Devendra Fadnavis clarifies stance on PM CARES Fund, Navi Mumbai Airport, and farmers’ loan waiver : नवी मुंबई विमानतळ, शेतकरी कर्जमाफी या मुद्द्यांवरही स्पष्ट केली भूमिका, जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले?

Mayur Ratnaparkhe

Devendra Fadnavis on PM CARES Fund :महाराष्ट्रात विशेषता मराठवाड्यात पावसाने पूरपरिस्थिती निर्माण केली आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक गावे पाण्यात आहेत, कित्येक घरं उद्धवस्त झाली आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. राज्यातील विद्यमान परिस्थितीबाबत सविस्तर माहिती, यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.  

 यानंतर माध्यमांना या भेटीबाबत खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी नवी मुंबई विमानतळ, शेतकरी कर्जमाफी यासह पीएक केअर फंड या मुदय्यांवरील प्रश्नांवर सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

नवी मुंबई विमानतळ -

‘’निश्चतपणे नवी मुंबई विमानतळला दि.बा.पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहीजे, असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारचीही अनुकलताच आहे. त्या संदर्भातील जी काही प्रक्रिया आहे, ती केंद्र सरकारमध्ये सुरू आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की, नवी मुंबई विमानतळाला आम्ही दि.बा.पाटील यांचं नाव देवू शकू.’’

शेतकरी कर्जमाफी -

’’कर्जमाफी संदर्भात आम्ही आमच्या घोषणापत्रात जे आश्वासान आम्ही दिलेलं आहे, त्या आश्वासनाची पूर्ततात निश्चितपणे आम्ही करणार आहोत. ती आता कधी आणि कशी करायची यासंदर्भात आमची समिती तयार झालेली आहे. ती समिती अभ्यास करत आहे. यानंतरच तो प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवू, कारण हा कर्जमाफी ही वारंवार करता येत, म्हणून ती अधिक परिणामकारक कशी होईल, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. ’’

पीएम केअर फंड –

’’पीएम केअर फंड सारखा फंड, हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तयार करता केंद्र सरकारने परवानगी दिली. कोविड करिता तो तयार झाला, ६०० कोटी त्या फंडात आले, एक नवा पैस देखील ते खर्च करू शकले नाहीत, आणि आज अवस्था अशी झाली आहे. की तो फंड नियमानुसार कोविडसाठी तयार झाला आहे त्यामुळे तो इतरत्र खर्च करता येत नाही, त्यामुळे त्याचं आता नेमकं काय करायचं, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे ६०० कोटी आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाहीत, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकावावं हे देखील ठरवलं पाहीजे. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttrakhand : उत्तराखंडमध्ये नकल माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नवा कायदा लागू, CM धामी यांचा अल्टिमेटम

भारताविरुद्ध Asia Cup Final जिंकायची असेल तर 'अभिषेक बच्चन'ला लवकर बाद करा! शोएब अख्तरचा पाकिस्तानींना अजब सल्ला, Video

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट 'गोट्या गँगस्टर' लवकरच भेटीला; टीझर प्रदर्शित

Pune News : माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Madha News : सीना नदीच्या महापुरात दिव्यागांची घरे नव्याने उभारण्यासाठी सरसावले आनंद साधना प्रकल्पाचे दिव्यांग बांधव

SCROLL FOR NEXT