politics esakal
महाराष्ट्र बातम्या

मोदींची नक्कल, विरोधकांचा आक्षेप; भास्करराव जाधव म्हणाले...

जाधवांच हे चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, माफी मागा; फडणवीस आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

जाधवांच हे चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, माफी मागा; फडणवीस आक्रमक

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत (Mumbai) होत आहे. (winter session) दरम्यान काही राजकीय मुद्द्यांवरून सध्या खंडाजंगी सुरु झाले आहे. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर नव्हे तर पंतप्रधान होण्याआधी वक्तव्य केलं होतं. त्यावरून विरोधक शब्दछल करत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं. (bhaskarrao jadhav) तसंच पंतप्रधानांची नव्हे तर उमेदवाराची नक्कल केली असं उत्तर भास्कर जाधव यांनी दिलं आहे. यावरून भास्करराव जाधव यांनी अंगविक्षेप करून पंतप्रधानांबद्दल बोलणं सहन केलं जाणार नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे असं म्हणत भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, भास्कर जाधव (bhaskarrao jadhav) यांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना त्यांची नक्कल केली आहे. यावरून नेते आक्रमक झाले आहेत. जाधवांच हे चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, माफी मागा, हे चालू देणार नाही अंस म्हणत फडणवीस आक्रमक झाले. अंगविक्षेप मागे घेतो म्हणतायत. ते गमतीने घेतायत. त्यांना वाटतं की आम्हाला समजत नाही, अंगविक्षेप कसे मागे घेणार, सभागृहात त्यांनी मान्य केलं आहे तर माफी मागावी. भास्कर जाधव यांनी केलेली नक्कल हे वाईट आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

यावर विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की भास्कररावांनी जे काही अंगविक्षेप केले, पंतप्रधानांबद्दल बोलले ते योग्य नाही, ते तपासून बघतो असं अध्यक्ष म्हणाले, सभागृह स्थगित करा अशी विरोधकांची मागणी, पण हे सगळं करण्यापेक्षा मी माझे अंगविक्षेप आणि शब्द मागे घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT