Shiv Sena News | Uddhav Thackeray News | Sanjay Raut News | Rashmi Thackeray News
Shiv Sena News | Uddhav Thackeray News | Sanjay Raut News | Rashmi Thackeray News 
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले असून तीन बंड थोपवणाऱ्या शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची या बंडामुळे हिरावली जाण्याची शक्यता निर्माण झालीये. शिवसेनेवर ही वेळ का ओढावली, यासाठी जबाबदार कोण या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता तीन नेत्यांची नावे समोर येतात. (Shiv Sena News)

२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी काडीमोड करत काँग्रेस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. महाविकास आघाडीचे शिल्पकार असले तरी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. मात्र, अवघ्या अडीच वर्षात हे पद गमावण्याची शक्यता निर्माण झालीये. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि रश्मी- आदित्य ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेचे भवितव्य संकटात सापडल्याचे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत आहे. (Udhhav Thackeray News)

उद्धव ठाकरेंचं कुठे चुकले?

बाळासाहेब ठाकरे यांनी रिमोट कंट्रोल स्वत:कडे ठेवणे पसंत केले होते. त्यांनी संविधानिक पद स्वीकारले नाही. पण उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि इथेच त्यांना फटका बसल्याचं मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रातील वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. उद्धव ठाकरे झाकलेली मूठ होती. पण सीएमपदी विराजमान झाल्यावर ती उघड झाली. प्रशासकीय पकड नसल्याचं समोर आले. उद्धव ठाकरेंपेक्षा अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड असल्याचं नेत्यांचं म्हणणे आहे. याशिवाय जनसंपर्क नाही, निर्णय प्रक्रियेवर किचन कॅबिनेटचा प्रभाव यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या. उद्धव ठाकरे जनतेशी कनेक्ट नाही. प्रशासकीय कामाबाबत जनतेचा अपेक्षाभंग झालाय. पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही ते आपुलकीशी बोलत नाही, याकडे राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर यांनी लक्ष वेधलंय.

मुख्यमंत्र्यांचं आजारपण आणि आदित्य ठाकरेंची एन्ट्री

मविआ सरकार स्थापन होत असताना शिवसेनेच्या गोटात किती मंत्रीपदं येणार याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. मात्र मलईदार खाती राष्ट्रवादीने लाटली. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना खाती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आदित्य ठाकरेंचं राजकीय स्थान पक्क करण्यासाठी कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना त्यांच्याकडे मंत्रिपद देण्यात आलं. उद्धव ठाकरेंच्या आजारपणात आदित्य ठाकरेंच्या हातात सर्व सूत्र होती. यावेळी एकनाथ शिंदेंसह अन्य मोठ्या नेत्यांनाही आदित्य ठाकरेंचे उंबरे झिजवायला लागत होते. कामांसाठी वेळ मागावी लागत असे. आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांमध्ये नाराजी वाढली होती, असे ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी सांगितले.

शिवसेनेतही घराणेशाही?

आदित्य ठाकरेंच्या हातात अनेक गोष्टींची सूत्र आल्यानंतर वरिष्ठ नेत्यांना सापत्न वागणूक मिळाल्याची तक्रार बंडखोर आमदारांनी केलीये. पक्षासाठी आयुष्य खर्च करूनही आदित्य ठाकरेंनी सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही. यामुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये राग धुमसत राहिला. यातच वरुण सरदेसाई यांचाही पक्षांतर्गत निर्णयांमध्ये वाढत असलेला हस्तक्षेप वरिष्ठ नेत्यांच्या पचनी पडत नव्हता. आदित्य ठाकरेंचा एक गट तयार झाला. यात वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण, अमेय घोले, राहुल कनाल यांचा समावेश आहे. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत.

मुंबई महापालिकेतील कंत्राट प्रक्रियेत या गटाचे वर्चस्व असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचं खात्यातले काम चांगले होते. पण उद्धव ठाकरेंसारखेच ते देखील मोजक्याच लोकांमध्ये वावरतात, जनसंपर्कही कमी आणि पक्षातील ज्येष्ठ आमदारांशी समन्वय नसल्याने आदित्य ठाकरेंना विरोध वाढला. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमागे आदित्य ठाकरेंचा वाढता प्रभाव आणि वरुण सरदेसाईंची ठाण्यातील घुसखोरी हे देखील कारणीभूत ठरली, असं ठाण्यातील राजकीय वर्तुळातील मंडळी सांगतात. काही दिवसांपूर्वी मुंबईतील आघाडीच्या वृत्तपत्राच्या संपादकांसोबत ठाकरे कुटुंबीयांनी संवाद साधला होता. या बैठकीतही आदित्य ठाकरे अनुपस्थित होते. यावरुन त्यांच्या कार्यशैलीचा अंदाज येतो, असे बैठकीला उपस्थित असलेले संपादक सांगतात.

उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे हा संदेश पक्षात गेलाय. पण हीच गोष्ट शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आवडली नाही, असं मत मकरंद मुळे यांनी साम टीव्हीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

राज ठाकरेही म्हणाले होते, संजय राऊत शिवसेनेची की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही

संजय राऊतांनी ठाकरे कुटुंबात आग लावली, ते शिवसेना संपवणार, अशी टीका राणे कुटुंबाकडून वारंवार केली जाते. संजय राऊत यांच्या टोकाच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीतील अन्य नेतेही नाराज होते. शिवसेना – भाजपामधील कटूता वाढण्यासाठी संजय राऊतांची विधानंच कारणीभूत ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होते. मध्यंतरी राज ठाकरेंनीही संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हेच समजत नाही, असा टोला लगावला होता.

नारायण राणेंचं ट्वीट

या सर्व घडामोडींमध्ये आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. यामध्ये त्यांनी संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने असे म्हटले आहे.

रश्मी ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा

रश्मी ठाकरे यांना माँसाहेबांचं स्थान घेता आलेलं नाही, असं राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी सांगितले. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात एंट्री घेतली आणि शिवसेनेच्या अडचणी वाढल्या. रश्मी ठाकरे यांचा जनसंपर्क नाही, असं श्रीकांत उमरीकर यांचं म्हणणे आहे. राजकारणात महत्त्वाकांक्षा असावी. पण रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी थेट संबंध कधीच नव्हता, याकडेही राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT