Diwali-LaxmiPujan
Diwali-LaxmiPujan 
महाराष्ट्र

Diwali 2019 : जाणून घेऊ लक्ष्मीपूजनाविषयी; अशी करावी केरसुणीची पूजा!

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मीपूजन

आश्विन अमावास्येस प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. मुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. म्हणून या रात्रीला यक्षरात्र असेही नाव आहे. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली.

विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नीय इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नीच इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.
- या दिवशी अनेक घरांत श्रीसूक्तपठण केले जाते.
- व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

या दिवशी सर्वजण अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

- या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. या लक्ष्मीने घरातील अलक्ष्मीला हाकलून देण्याची प्रथा आहे. अलक्ष्मीच या सणाची खरी इष्ट देवता असल्याचेही शास्त्रात मानले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात.

निर्ऋती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला पुढे अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचा उल्लेख `दुर्गासप्तशती`मध्ये आहे.
- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

- भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवलज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी.
- हा अतिशय शुभ दिन मानला जातो, कारण या दिवशी भगवान श्रीकृष्ण व भगवान महावीर यांच्यासह अनेक संतांनी व महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.

झाड़ूची पूजा कशी करावी?

धनत्रयोदशीला नवीन झाडू विकत घेण्याची आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची परंपरा आहे.
- धनत्रयोदशीला झाडू विकत घेताना ते विषम संख्येत असावे म्हणजे एक, तीन किंवा पाच या संख्येत झाडू विकत घेणे अधिक शुभदायक असते.
- नवीन झाडूच्या पूजेआधी घरातील काही भाग या झाडूने झाडून घ्यावा. त्यानंतर हा झाडू स्वच्छ, पवित्र स्थानावर ठेवून द्यावा.
- रात्री लक्ष्मी पूजन झाल्यानंतर कुंकू आणि तांदुळाने या झाडूची पूजा करावी. लाल रंगाचे पाच दोरे त्याच्यावर बांधावे. यामुळे झाडूची पूजा पूर्ण होईल.
- रात्री उशिरा या झाडूने घरातील केरकचरा काढावा आणि घराबाहेर टाकावा. त्यानंतर हातपाय धुवून घरात प्रवेश करावा. लक्ष्मीने अलक्ष्मी घराबाहेर हाकलण्यासाठी ही प्रथा आहे.  

केरसुणीविषयी आणखी काही 

- शास्त्रात झाड़ूला लक्ष्मीचे रूप मानण्यात येते, यामुळे झाड़ूचा कधीच अपमान करू नये.
- झाडूला कधीच पाय लावू नये.
- झाड़ू कधीच उभा ठेवू नये.
- कुणालाही झाड़ूने मारु नये, अगदी प्राण्यालाही.
- घरातील एखादी व्यक्ती बाहेर पडल्यानंतर लगेच झाडून काढू नये.

पूजनासाठी मुहूर्त 

- लक्ष्मीपूजन (27 ऑक्टो बर) : सायं. 6 ते रात्री 11.30 पर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT