Balasaheb Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

उसाच्या गाळपाशिवाय महाराष्ट्रातील कारखाने बंद करु नका : सहकारमंत्री

हेमंत पवार

गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस गाळपाचं मोठं आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे.

कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा उसाचे उत्पन्न वाढल्यानं गाळपाचं कारखान्यांपुढं मोठं आव्हान आहे. गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस, दुष्काळी भागात पोहचलेल्या पाण्यामुळं शेतकऱ्यांनी उसाचं चांगलं उत्पादन घेतलंय. त्यामुळं सर्व कारखान्यांना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय बंद न करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, अतिरिक्त उसाच्या बाबतीतला प्रश्न दर पाच-सहा वर्षांनी निर्माण होतो. कारण, पट्टा पद्धत, ड्रिप पध्दतीमुळं उसाचं उत्पन्न वाढलं आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर आता उभा असलेला ऊस गाळपाचं मोठं आव्हान साखर कारखान्यांसमोर (Sugar Factory) आहे. मी सध्या सर्व राज्यातील आढावा घेत असून संपूर्ण ऊस गाळप झाला पाहिजे, असं नियोजन सुरू आहे. चालूवर्षी हेक्टरी उत्पादनही वाढलं आहे. यंदा बीड, जालना, परभणी या तीन मराठवाड्याच्या जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत.

सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, प्रतापगड सहकारी कारखाना (Pratapgad Cooperative Factory) आणि खंडाळा कारखाना (Khandala Factory) हे सुरू न झाल्याने तेथे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यासाठी अजूबाजूच्या परिसरातील कारखान्यांना ऊस गाळपाच्या सूचना दिलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जुना खानापूर या दुष्काळी भागात टेंभू-ताकारी योजनांचे पाणी गेल्याने ऊस वाढला आहे. तरीही जोपर्यंत उभ्या उसाचे संपूर्ण गाळप होत नाही, तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत, अशा सूचना कारखान्यांना केलेल्या आहेत. तसेच साखर आयुक्तांकडून त्याचा मी स्वतः आढावा घेत असल्याचेही सहकारमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT