shiv sena leader sanjay raut  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ईडी समन्सनंतर संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत म्हणून...

सकाळ डिजिटल टीम

आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत म्हणून...

सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स पाठवले असून उद्या त्यांची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार राऊतांनी एक ट्वीट केल आहे. मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. या लढाईत मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. मात्र माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्विकारणार नाही, असा थेट इशारा राऊतांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. (maharashtra news)

सध्या सुरु असलेल्या राजकीय वातावरणात अनेक आरोप प्रत्यारोप आणि बैठकी सुरु आहेत. हा शिवसेनेचा अंतर्गत वाद असून आम्ही यापासून अनभिज्ञ आहोत अशी भूमिका भाजापाने घेतली आहे. दरम्यान, आता या पार्श्वभूमीवर ईडीने खासदार राऊतांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे राऊतांनी यावर ट्वीट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे.

ट्वीटमध्ये राऊत म्हणतात की, ते म्हणाले, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे....छान....महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत आणि आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. त्यामुळं मला रोखण्यासाठीच हे कारस्थान सुरू आहे. मात्र एक लक्षात घ्या, माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या आणि मला अटक करा! जय महाराष्ट्र!, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्याचे वातावरण पाहता राज्यातील घडामोडींचा वेग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या राजकारणाच्या पार्श्वभूमrवर आता ठाकरे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या परतीचे दोर कापल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या ठाकरे सरकारमधील सेना नेते गुवाहाटीत आहेत. या सर्व नेत्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दणका दिला आहे. ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांची खाती काढून घेतली असून मंत्रीमंडळाचं फेरवाटप केलं आहे. या खात्यांचा तात्पुरता कार्यभार नव्या मंत्र्यांवर सोपवला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT