Eknath Shinde, Abdul Sattar and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

शिंदे १८ तास काम करणारे मुख्यमंत्री; अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील काही दिवसात होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केलं आहे. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदावर द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्रात असून त्या मुंबईत शिंदे गटाच्या आमदारांना भेटणार आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये असून तिथेच मुर्मू त्यांची भेट घेणार आहेत. यावेळी हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Abdul Sattar News in Marathi)

अब्दुल सत्तार यांनी द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार, अशी शक्यता व्यक्त केली. त्याचवेळी त्यांच्या पक्षाच्या नियोजनानुसारच सर्वकाही होईल, असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी शिंदे यांनी आधीचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सत्तार म्हणाले की, युती केल्याचे अनेक फायदे असून आम्हाला १८ तास काम करणारे मुख्यमंत्री लाभले आहेत. अनेक आमदारांचे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे कामं अपेक्षित होती, ती उद्धव ठाकरे यांच्याकडून राहिले होते. तेच कामं आता एकनाथ शिंदे पूर्ण करत असल्याची टोला सत्तार यांनी लगावला.

ते पुढं म्हणाले की, एकनाथ शिंदे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शिवसेनेचे अनेक खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. प्रतीक्षा करा, सगळ स्पष्ट होईल. शिंदे समुद्रात शांत बसले आहेत. ज्याप्रकारे नद्या समुद्रात येऊन मिळतात, तसेच छोटे-मोठे नेते शिंदेंना येऊन मिळतील, असा दावा सत्तार यांनी केला. यावेळी त्यांनी १९ आणि २० तारखेला मंत्र्यांचा शपथविधी होईल, असंही सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT