Eknath Shinde VS Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

"So Called चाणक्य/बडवे..."; एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर थेट निशाणा

आपल्याला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल या पत्रातून नाराजी व्यक्त करत भावनिक आवाहनही करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंड केलेले शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ऐतिहासिक सत्ताबदलाच्या दिशेने जाण्याची चिन्हं आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी- काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवसेना नेतृत्वावर आपण नाराज नाही, असंही ते म्हणाले होते. आता या नाराजीनाट्यात संजय राऊतांचीही एन्ट्री झालेली दिसत आहे. (Eknath Shinde Slams Shivsena MP Sanjay Raut)

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) नुकतंच ट्वीट करत एक पत्र शेअर केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं ते पत्र आहे. या पत्रातून केलेला उल्लेख म्हणजे संजय राऊतांवर साधलेला थेट निशाणा असल्याचं दिसत आहे. अडीच वर्षे तुमच्या बंगल्यात प्रवेश करण्यासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच So called (चाणक्य, कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होते, असा उल्लेख या पत्रात आहे.

मतदारसंघातील कामं, इतर प्रश्न, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायंचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय, असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनसात बंगल्यावर गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेक वेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का? असा सवालही या पत्रातून उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT