मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मनधरणी करण्यासाठी सुरताला गेलेले रविंद्र फाटकच (Ravindra Phatak) शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी फाटक एकनाथ शिंदेचे मन वळवण्यासाठी सुरत येथील हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर आज आता ते थेट गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या गटात सहभाग होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून, राज्यात सत्तांतराचे वारे आता जोरात वाहू लागले आहे. (Eknath Shinde Latest News In Marathi)
दरम्यान, काही वेळापूर्वी रविंद्र फाटक यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) हेसुद्धा गुवाहटीमध्ये दाखल झाले झाले आहेत. रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, आता तेच शिंदेंच्या गटात सहभागी होत असल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंचें निकटवर्तीय असणारे फाटक विधान परिषदेचे आमदार आहेत. एवढेच नव्हे तर, मंगळवारी मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत फाटक मुंबईतून शिंदेची मनधरणी करण्यासाठी सूरत येथे गेले होते. मात्र, आता ते स्वतःच गुवाहटी येथे जाऊन शिंदेंना सहभागी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे गट उद्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. आमच्याकडे ४१ आमदारांचं संख्याबळ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ सह्यांचं पत्र पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढेच नव्हे तर, शिंदेंच्या गोटात अजून काही आमदार सहभागी होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्या घेऊन पत्र पाठवण्यात आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सह्या घेऊन पत्र राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे.
भाजप सत्ता आणि पैशाच्या जोरावर अस्थिरता आणत आहे - ममता
दरम्यान, राज्याच्या सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा महाविकास आघाडीला समर्थन असेल, भाजपला रोखण्यासाठी आजही आम्ही मविआसोबत आहोत असं नाना पटोले म्हणाले आहेत. अजित पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी देत नव्हते त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाल्याचे पटोले म्हणाले. भाजप सत्ता, पैशाच्या जोरावर अनेक राज्यांत सरकार अस्थिर करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपचे हे कारस्थान फार दिवस चालणार नाही लवकरच त्यांना सत्तेवरून खाली उतरावे लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.