Amti Shah, Narendra Modi and Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

एकनाथांना हवेत आणखी दोन 'नाथ'? भाषणात 'एवढ्या'वेळा केला मोदी-शहांचा उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत आयोजित करण्यात आलेले बहुचर्चित दसरा मेळावे बुधवारी पार पडले. या मेळाव्याची तयारी मागील महिनाभरापासून सुरू होती. आता या मेळाव्यातील भाषणांची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण एक तासापेक्षा कमी वेळेत संपवलं. तर एकनाथ शिंदे यांचं भाषण दोन तासांहून अधिक वेळ चाललं. मात्र भाषणांत मोदी-शहांच्या केलेल्या उल्लेखामुळे शिंदे आगामी काळात थेट भाजपचा झेंडा हाती घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Eknath Shinde news in Marathi)

एकनाथ शिंदे यांनी भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावेळी अनेकदा शिंदे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. 'कटप्पा' टीकेवर शिंदे उद्विग्न झाल्याचं पाहिलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जेवढ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंवर टीका केली, त्यापेक्षा अधिक वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या दोन तासाच्या भाषणात तब्बल ८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा उल्लेख केला. भाजपकडे संख्याबळ अधिक असताना केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांना डावलून शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. वास्तविक पाहता, उद्धव ठाकरे सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी मागत होते.

या व्यतिरिक्त शिंदेयांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. जेव्हा-जेव्हा आपत्ती संकट येतात त्या-त्या वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे असतो. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कोणी धरू शकत नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं. विशेष म्हणजे शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांच्या केलेल्या कामाविषयी चकार शब्द उच्चारला नाही.

एकंदरीतच शिंदे यांची मोदी-शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीची आपुलकी पाहता, ते भाजपचा झेंडा हाती घेतील, अशी शक्यता व्यक्त होतेय. मात्र ही स्थिती न्यायालयातील निकालानंतरच निर्माण होऊ शकते. न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजुने गेल्यास, शिंदेंसाठी भाजप पहिला पर्याय राहिल. मात्र भाजप शिंदेंसोबत असलेल्या ४० हून अधिक आमदारांसाठी किती अनुकूल असेल हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

केंद्रीय नेतृत्वाचा फडणवीसांपेक्षा अधिक विश्वास शिंदेंवर?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना केवळ ४० आमदार असताना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. त्याचवेळी मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या फडणवीसांना धक्का दिला. त्यामुळे शिंदे हे मोदी-शहांच्या गुडबुकमध्ये गेले, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगतेय. शिवाय मोदी-शहांनी शिंदेंवर दाखवलेला विश्वास चर्चाचा विषय ठरतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT