Jayant Patil
Jayant Patil  Sakal
महाराष्ट्र

Jayant Patil : शिंदे गटाची ताकद खूप मोठी; नव्या सेनाभवनावर NCP ची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Jayant Patil On New Shivsena Bhavan : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून, याबाबत अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निकाल लागलेला नाही. असे असतानाच शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना नवे शिवसेना भवन उभारण्याची घोषणा करून मोठा धक्का दिला असून, दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारण्याचृत येणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिशिवसेनाभवन बांधले तरी, देव पहिल्या शिवसेना भवनात आहे, असे विधान पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले की, “एकनाथ शिंदे गट नवे सेनाभवन बांधू शकतील कारण त्यांची ताकद फार मोठी आहे. सत्तांतरावेळी सुरतपासून जो प्रवास झाला त्यातून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे ते प्रतिसेनाभवन बांधतील. मात्र, मंदिर बांधले तरी त्या मंदिरामध्ये देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात असल्याचे ते म्हणाले.

सेना भवन उभारणार? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं!

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी नव्या शिवसेना भवनाच्या विषयी गुरुवारी माहिती दिली होती. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं, यासाठी एक मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार असल्याचं सरवणकर म्हणाले होते. मग त्याला तुम्ही सेना भवन म्हणा, प्रतिसेना भवन म्हणा, काहीही म्हणा, असंही ते म्हणाले होते. यावरुनच आता प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई दादर इथं प्रति शिवसेना भवन एकनाथजी शिंदे करत आहेत हा गैरसमज पसरवला जात आहे. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता यावं ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे.शिवसेना भवन बद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Video: काय होतास तू काय झालास तू ? इम्रान खान की आजोबा, पाकच्या माजी पंतप्रधानांचा सोशल मिडीयावरील व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : भाजप महिला मोर्चाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

Ex-Wipro CEO: राजीनाम्यानंतर, विप्रोच्या सीईओने कंपनीचे शेअर्स विकून कमावले 70 कोटी; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शाळेच्या आवारात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संतप्त जमावाने पेटवली शाळा

Biotin Rich Food : केस, त्वचा, मधुमेह आणि बरंच काही…; बायोटीनयुक्त पदार्थ खा अन् या आजारांची कायमची सुट्टी करा!

SCROLL FOR NEXT